'माझ्यापेक्षा जास्त कमावतेस, थार गाडी दे..', हुंड्यासाठी बायकोला अमानुष मारहाण
Crime news : कौटुंबिक हिंसाचार आणि पतीच्या क्रूरतेचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. आपल्या सलून मालकीण पत्नीपेक्षा जास्त कमावत असल्याने तिला सतत हिणवत, पतीने हुंडा म्हणून आधी थार आणि एका महागड्या स्पोर्ट्स बाईकची मागणी करत त्या महिलेला सर्वांसमोर निर्घृणपणे मारहाण केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कौटुंबिक हिंसाचार आणि पतीच्या क्रूरतेचे धक्कादायक प्रकरण
रस्त्यावर ओढत फरफटत आणले
Crime news : कौटुंबिक हिंसाचार आणि पतीच्या क्रूरतेचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. आपल्या सलून मालकीण पत्नीपेक्षा जास्त कमावत असल्याने तिला सतत हिणवत, पतीने हुंडा म्हणून आधी थार आणि एका महागड्या स्पोर्ट्स बाईकची मागणी करत त्या महिलेला सर्वांसमोर निर्घृणपणे मारहाण केली. त्यानंतर आरोपीने महिलेचे केस पकडले, तिला रस्त्यावर फेकले आणि लाथा मारल्या. ही संपूर्ण भीषण घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. जगतपुरी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी पाडितेची तक्रार आणि फुटेजच्या आधारे तपास करण्यात आला. ही घटना पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातील आहे.
हे ही वाचा : बीड: 19 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू कुटुंबीयांना हत्येचा संशय
पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, पीडितेची ट्विंकल (वय 28) अशी ओळख समोर आली. ती स्वत:चे सलून चालवते. ट्विंकलला तिच्या मागील लग्नापासून एक सात वर्षांचा मुलगा देखील आहे. तिच्या पहिल्या घटस्फोटाच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, तिची भेट रितीश शर्मा या वैद्यकीय व्यावसायिकाशी झाली. ते दोघेही मित्र बनले आणि नोव्हेंबर 2025 मध्ये त्यांनी विवाह केला आणि ते जस्सियान ग्रीन एन्क्लेव्ह येथे राहू लागले होते.
पतीने हुंड्यासाठी छळ करण्यास केली सुरुवात
लग्नानंतर अवघ्या काहीच महिन्यांत आरोपी पतीने हुंड्यासाठी तिचा छळ करण्यास सुरुवात केली होती. रितीश शर्मा हा तिला सतत टोचून बोलायचा. 'तू माझ्यापेक्षा जास्त कमावतो', मग मला थार देऊ शकत नाहीस? असे म्हणत तो पत्नीकडे थारची मागणी करायचा. सुरुवातीला वाद मध्यस्थीद्वारे मिटवण्यात आला. नंतर आरोपीने एका महागड्या स्पोर्ट्स बाईकची मागणी केली. घटनेच्या दिवशी मोटारसायकलवरून झालेला वाद इतका वाढला की, ट्विंकलने आपला जीव वाचवण्यासाठी शेजारच्या घरी धाव घेतली होती.
रस्त्यावर ओढत फरफटत आणले
आरोपी पतीने तिचा रस्त्यावर पाठलाग केला आणि तिच्यावर अमानुष अत्याचार केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी ट्विंकलला रस्त्यावर कानशिलात मारताना, तिचे केस पकडून तिला रस्त्यावर फरफटत आणले आणि केस ओढू लागला होता. यादरम्यान तिने आरडाओरड केली. इतक्यात घरातील लोक घराबाहेर आले आणि त्यांनी या वादात हस्तक्षेप करून पीडितेला आरोपीच्या तावडीतून सोडवले.
हे ही वाचा : गरब्यात तलवार कोयत्यांची दहशत, राजन दुबेला पोलिसांची नोटीस
संबंधित घटनेनंतर पीडितेनं तात्काळपणे पोलीस ठाण्यात जाऊन न्यायाची मागणी केली, तिने जगतपुरी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली, पुरावा म्हणून सीसीटीव्ही फुटेज सादर केले. या प्रकरणी आरोपीवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई केली.
