उपचाराच्या नावाखाली क्रुरता, 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Crime News : उपचाराच्या नावाखाली एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी व्लॉगर आणि इस्लामिक अकादमीच्या संचालकाला अटक केली आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

उपचाराच्या नावाखाली पीडितेवर ठिकठिकाणी अत्याचार

point

आरोपीने पीडितेच्या आजीच्या विश्वासाला दिला तडा 

Crime News : उपचाराच्या नावाखाली एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी व्लॉगर आणि इस्लामिक अकादमीच्या संचालकाला अटक केली आहे. ही घटना केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील ओचिरा येथील आहे. या प्रकरणात कुटुंबाच्या विश्वासाचा संचालकाने गैरफायदा घेतल्याचा कुटुंबीयांनी आरोप केला आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे ही वाचा : अल्पवयीन मुलीवर दुकानात लैंगिक अत्याचार, मृत बाळाला दिला जन्म

पीडितेला ठिकठिकाणी नेऊन केला अत्याचार 

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने 2025 ते 2026 दरम्यान पीडितेला विविध ठिकाणी नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते. अटक केलेल्या आरोपीची मोहम्मद नियास जोहरी (वय 34) अशी ओळख समोर आली असून तो इस्लामिक अकादमीचा संचालक आहे. आरोपीवर पॉक्सो कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. 

आरोपीने पीडितेच्या आजीच्या विश्वासाला दिला तडा 

पोलिसांच्या माहितीनुसार, संपूर्ण प्रकरण हे मुलीच्या आजारपणाने सुरू झाले. प्रार्थनेने तिचा आजार बरा होईल या विश्वासनाने मुलीच्या आजीने मुलीला मोहम्मद जोहरीकडे नेले होते. याच विश्वासाचा आरोपीने विश्वासघात केला. आरोपीने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. दरम्यान, पोलिसांचे म्हणणे असंय की, 2025 ते 2026 दरम्यान, आरोपीने मुलीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केला.  

दरम्यान, जेव्हा मुलीने लैंगिक शोषणाबाबत तिच्या कुटुंबाला घडलेला घटनाक्रम सांगितला असता, प्रकरण उघडकीस आले. तिच्या तक्रारीनंतर, पोलिसांनी तातडीने कारवाई करत प्रकरणाचा पुढील तपास केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, मुलीच्या तक्रारीच्या आधारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

हे ही वाचा : मुंबई: लग्नातील जेवणाने वऱ्हाड्यांना फुड पॉइजनिंग, नवरा बायकोसह 27 जण रुग्णालयात दाखल

यानंतर आता आरोपीचा शोध आणि तपास सुरू झाला आहे. पोलिसांनी शनिवारी रात्री करुणागप्पल्ली येथून मोहम्मद नियास जोहरीला ताब्यात घेतले. त्याची चौकशी करण्यात आली आणि रविवारी त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.