तुळजापूर हादरले! 18 वर्षीय विद्यार्थ्याची निर्घृण हत्या, माजी नगराध्यक्षासह दोघांना अटक

तुळजापूरमध्ये झालेल्या 18 वर्षीय विद्यार्थ्याच्या हत्येने खळबळ माजली आहे. याप्रकरणी माजी नगराध्यक्षाला अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Dharashiv Crime
Dharashiv Crime
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

तुळजापूरमध्ये विद्यार्थ्याची हत्या

point

माजी नगराध्यक्षाला अटक

point

नेमकं प्रकरण काय?

Dharashiv Crime, गणेश जाधव : तुळजापूर शहरात 18 वर्षीय समीर जब्बार पटेल याची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महाविद्यालयीन तरुणीचा पाठलाग करून तिला त्रास देत असल्याच्या संशयातून आणि जुन्या वादातून ही हत्या झाली. या प्रकरणी तुळजापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष संतोष देविदास कदम ऊर्फ परमेश्वर आणि संजय विलास जाधव यांना पोलिसांनी अटक केली असून, या हल्ल्यात समीरचा नातेवाईक अरबाज अफसर सय्यद हा गंभीर जखमी झाला आहे. समीर हा तुळजाभवानी महाविद्यालयात बी.कॉम प्रथम वर्षात शिक्षण घेत होता आणि काही महिन्यांपूर्वी त्याच्यावर एका विद्यार्थिनीचा पाठलाग केल्याचा आरोप झाल्यानंतर त्याला समजही देण्यात आली होती.

तीन नोव्हेंबरला काय घडलं?

घटनेच्या दिवशी 3 नोव्हेंबर रोजी समीर परीक्षा देऊन घरी परतला होता, त्यानंतर कुटुंबीयांच्या सांगण्यावरून एका नातेवाईकाला आणण्यासाठी गेलेल्या समीरला माजी नगराध्यक्ष संतोष कदम यांच्या घरी नेण्यात आले. तेथे समीरचे आई-वडील पोहोचल्यानंतर, संतोष कदम आणि त्यांचे मेहुणे संजय जाधव यांनी पूर्वीच्या कारणावरून त्याला मारहाण केली आणि नंतर काही जण त्याला बाहेर घेऊन गेले. समीरच्या आईने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यात आली, तसेच त्यांचा मोबाईलही काढून घेण्यात आला. यानंतर समीरच्या आई-वडिलांना काही वेळ घरातच डांबून ठेवण्यात आले होते.

हे ही वाचा : Maharashtra Weather: महाराष्ट्रात हवामानात मोठा बदल! कुठे पावसाच्या सरी, कुठे कोरडं वातावरण?

पार्किंग परिसरात सापडला समीर

रात्री उशिरा गंभीर जखमी अवस्थेत घरी परतलेल्या अरबाज अफसर सय्यद याने मस्के, प्रणव देवकते आणि अन्य दोन व्यक्तींनी आपणास व समीरला बेदम मारहाण केल्याची माहिती दिली. यानंतर कुटुंबीयांनी भारतीयबुवा मठाजवळील पार्किंग परिसरात शोध घेतला असता, समीर एका वॉचमनच्या खोलीजवळ अत्यंत गंभीर अवस्थेत पडलेला आढळला. त्याला तत्काळ तुळजापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, तर जखमी अरबाजवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा : Personal Finance: मुंबई-पुण्यासारख्या शहरांच्या विकासासाठी पैसे गुंतवा, व्याजही मिळवा!

दोघांना अटक, चौघांचा शोध सुरु

या गंभीर प्रकरणी मृत समीरची आई अन्सर जब्बार पटेल यांच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात संतोष कदम, संजय जाधव, प्रणव देवकते, मस्के यांच्यासह सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील दोन्ही बाजूंचे म्हणणे समोर आले असून, पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहनही जप्त केले आहे. उर्वरित चार फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके वेगाने रवाना करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.