प्रॉपर्टीच्या लोभापोटी महिलेनं दोन सावत्र मुलांच्या बिर्याणीत मिसळले विष

Crime News : प्रॉपर्टीच्या लोभापोटी सावत्र आईने आपल्या पतीच्या पहिल्या दोन निष्पाप मुलांच्या बिर्याणीत विष मिसळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ADVERTISEMENT

MumbaiTak
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून सावत्र आईचं गैरकृत्य

point

दोन्ही निष्पाप मुलांचा रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू​​​​​​​

Crime News : प्रॉपर्टीच्या लोभापोटी सावत्र आईने आपल्या पतीच्या पहिल्या दोन निष्पाप मुलांच्या बिर्याणीत विष मिसळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सात्विक (वय 10) आणि नित्या (वय 8) अशी दोन निष्पाप अपत्यांची ओळख समोर आली आहे. आश्चर्याची बाब अशी की, यापूर्वी देखील तिने याच मुलांना मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ती वाचली होती. आरोपी महिलेनं पुन्हा नको तिच चूक केली आणि मुलांना ठार केले. सखोल तपासातून पोलिसांनी सावत्र आई मेरी आणि पती रामबाबू यांना अटक केली. हा प्रकर आंध्र प्रदेशातील नेहरूनगर परिसरातील आहे, या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे ही वाचा : वाशिम: 19 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार, दुकानदारानं केलं गर्भवती

घडलेल्या घटनेनुसार, नेहरूनगरचे रहिवासी असलेल्या रामबाबूंनी 2015 मध्ये स्वर्ण नावाच्या महिलेशी विवाह केला होता. त्यांना सात्विक आणि नित्या नावाचे दोन अपत्य होती. कौटुंबिक कलहातून स्वर्णने 2022 मध्ये जीवन संपवलं. त्यानंतर रामबाबूंनी मेरीशी विवाह केला, जिचा हा दुसरा विवाह झाला होता आणि तिला एक मुलगा आहे. 

कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून सावत्र आईने दोन्ही मुलांना संपवलं

पोलीस तपासातून या हत्येमागील मुख्य कौटुंबिक मालमत्तेच्या वादातून सावत्र आईने दोन्ही मुलांची हत्या केल्याची माहिती समोर आली. मेरीला भीती होती की, तिच्या पतीची संपूर्ण मालमत्ता त्याच्या पहिल्या पत्नीच्या मुलांना मिळेल. ती त्यांना घरातून बाहेर काढण्याची सतत धमकी देत होती. 20 ऑक्टोबर रोजी, मेरीने उंदीर मारण्याचे औषध बिर्याणीत मिसळले आणि ती बिर्याणी मुलांना खाण्यास दिली, पण झाले असे की औषधाचा परिणाम मुलांना झाला नसल्याचे दिसून आले. 

दोन्ही निष्पाप मुलांचा रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू

त्यानंतर तिने बिर्याणीत विष टाकण्याचा प्रयत्न केला. टीव्ही 9 भारतवर्ष या वृत्तमाध्यमाच्या वृत्तानुसार, कोठापेट पोलीस ठाण्याचे कॉनस्टेबल वीरशय्या चौधरी यांना मुलांचा संशयास्पद मृत्यूंबाबत संशय आला. अखेरीस 24 ऑक्टोबर रोजी, दोन्ही निष्पाप मुलांचा रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला. 

हे ही वाचा : नांदेडमध्ये नातेवाईकांचा वाद, भांडण सोडवण्यास गेलेल्या तरुणाला संपवलं; 12 जण अटकेत

मृतदेहाची तपासणी केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले, त्यानंतर विषबाधेची पुष्टी करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ रामबाबूंच्या घरावर छापा टाकला, जिथे उंदीर मारण्याचे विष जप्त करण्यात आले. सखोल तपासानंतर संपूर्ण कट उघडकीस आला. पोलिसांनी या कटात सामील सावत्र आई मेरी आणि वडील रामबाबू या दोघांना अटक करण्यात आली.