नांदेडमध्ये नातेवाईकांचा वाद, भांडण सोडवण्यास गेलेल्या तरुणाला संपवलं; 12 जण अटकेत
Nanded crime : नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली. मारहाण करताना वाद सोडवण्यासाठी मध्यस्ती केलेल्या तरुणाची हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात एक दोन नाही,तर तब्बल बाराही आरोपींना अटक केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दोन गटात दगडफेक सुरू
दगडफेकीदरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
बाराही आरोपींना अटक
Nanded Crime : कुंवरचंद मंडले - नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली. मारहाण करताना वाद सोडवण्यासाठी मध्यस्ती केलेल्या तरुणाची हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात एक दोन नाही,तर तब्बल बाराही आरोपींना अटक केली. ही घटना नांदेडच्या मुदखेड येथील नंदीनगर परिसरातील आहे. या मारहाणीत मध्यस्ती करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती समोर आली.
हे ही वाचा : नोकरीच्या नावाखाली करायचा फोन, 78 वर्षीय वृद्धाकडून अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार
दोन गटात दगडफेक सुरू
वाद सुरू असताना दोन गटात दगडफेक सुरू होती. यात मध्यस्थी करण्यासाठी गेलेला तरुण अर्जुन नकलवाड या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर गणेश कराड आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, नंतर प्रकरणाचा तपास करत आरोपीला अटक केली.
दगडफेकीदरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
घडलेल्या घटनेनुसार, मुदखेड शहरातील नंदीनगर परिसरात भीमराव नकलवाड आणि शेषराव नकलवाड या दोन गटांत मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. हा वाद सुरू असताना काही लोक दसऱ्याच्याच दिवशी एकत्र आले होते. त्यानंतर त्याच गटावर दगडफेक करण्यात आली होती. जेव्हा दोन्ही गटात वाद झाला असता, अर्जुन नकलवाड वाद सोडवण्यासाठी मध्यस्थीसाठी गेला होता. मात्र, अशातच दुसरीकडून मोठा दगड त्याच्या मानेवर जोराचा लागला.
हे ही वाचा : Astrology : आज 30 ऑक्टोबर 2026, 'या' राशींना सावधानतेचा इशारा
बाराही आरोपींना अटक
जोरदार भिरकावलेल्या दगडाने अर्जुनचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात खळबळ माजली आणि प्रकरण आणखी चिघळले. या घटनेची माहिती मिळताच मुदखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला. पोलीस इंस्पेक्टर गणेश कराडने वेगाने तपास केला आणि बाराही आरोपींना अटक केली आणि न्यायालयात हजर केले.
