नोकरीच्या नावाखाली करायचा फोन, 78 वर्षीय वृद्धाकडून अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

Crime New : वर्तमानपत्राचा मालक प्यारे मियां या व्यक्तीवर तब्बल दहा वेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याची घटना समोर आली आहे. संबंधित व्यक्तीने दोन मुलीना नोकरीचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचे वृत्त आहे. यानंतर त्या प्यारे मियां या व्यक्तीवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

ADVERTISEMENT

crime new
crime new
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

नोकरीचे आमिष दाखवून पाच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार 

point

वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने फ्लॅटमध्ये बोलावून लैंगिक अत्याचार 

Crime New : वर्तमानपत्राचा मालक प्यारे मियां या व्यक्तीवर तब्बल दहा वेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याची घटना समोर आली आहे. संबंधित व्यक्तीने दोन मुलीना नोकरीचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचे वृत्त आहे. यानंतर त्या प्यारे मियां या व्यक्तीवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने आरोपीला 77 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. या प्रकरणी सहयोगी असलेली तरुण राबियाला देखील 20 वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. ही घटना भोपाळच्या शाहपुरा येथील आहे. 

हे ही वाचा : Astrology : आज 30 ऑक्टोबर 2026, 'या' राशींना सावधानतेचा इशारा

पाच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार 

तसेच मियांला पाच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवले. हे प्रकरण 11 जुलै 2020 रोजी समोर आले. प्यारे मियां (वय 78) हा वृद्ध व्यक्ती अल्पवयीन मुलींना लक्ष करायचा, तसेच दरमहा 10 हजार रुपये पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून लैंगिक शोषण करायचा. याच गुन्ह्यांत मदत केल्याबाबत राबिया बी हिला देखील दोषी ठरवण्यात आल्याचे वृत्त समोर आले.  

वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने फ्लॅटवर बोलावून लैंगिक अत्याचार 

फिर्यादीनुसार, समुपदेशनादरम्यानचे हे प्रकरण उघडकीस आले आहे. पीडितेनं झालेल्या लैंगिक शोषणाचे वर्णन केले होते, तिने सांगितलं की, तिला वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने भोपाळच्या शाहपुरा भागातील एका फ्लॅटवर बोलावण्यात आले होते. पीडितेच्या म्हणण्यांनुसार, प्यारे मियांने पीडितेला जबरदस्ती दारू पाजली आणि लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर, अल्पवयीन मुलींचे देखील शोषण केले.  

पोक्सो कायदा आणि जन्मठेपेची शिक्षा 

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, विशेष पॉक्सो न्यायालयाने प्यारे मियां यांना पोक्सो कायदा आणि भारतीय दंड संहिता विविध कलमांखाली शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना आठ प्रकरणांत आमरण जन्मठेपेची आणि दोन प्रकरणांत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या सर्व शिक्षा एकाच वेळी भोगाव्या लागतील. 

हे ही वाचा : अश्लील व्हिडिओ, डाउनलोड हिस्ट्रीचा तपास; मुलींच्या लैंगिक शोषणाचा पर्दाफाश

या प्रकरणातील सरकारी वकील पी. एन. सिंग राजपूत यांच्या म्हणण्यांनुसार, प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी प्यारे मियांला अटक केली. न्यायालयाने प्यारे मियांला 10 जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.