9 मुलांच्या आईची हत्या, नवऱ्यानं शॉक दिला अन् कुऱ्हाडीने केले तुकडे

crime news : कौटुंबिक वादातून मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पतीने आपल्या पत्नीला आधी करंट दिला आणि नंतर तिच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करत तिची हत्या केली. नंतर आरोपीने स्वत:वर चाकूने वार केले आणि स्वत:ला संपण्याचा प्रयत्न केला.

ADVERTISEMENT

MumbaiTak
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

पती आणि पत्नीत सतत वाद

point

नवऱ्याने बायकोला संपवलं अन् स्वत:वरही केले वार 

Crime News : कौटुंबिक वादातून मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पतीने आपल्या पत्नीला आधी करंट दिला आणि नंतर तिच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करत तिची हत्या केली. नंतर आरोपीने स्वत:वर चाकूने वार केले आणि स्वत:ला संपण्याचा प्रयत्न केला. मृत महिला ही नऊ मुलांची आई होती. या प्रकरणात आरोपी नवऱ्याला ताब्यात घेतले असून पोलिसांनी त्याला रुग्णालयात भरती केले. हे प्रकरण झारखंडच्या जामताडा जिल्ह्यातील आहे, या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे ही वाचा : वाशिम: 19 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार, दुकानदारानं केलं गर्भवती

पती आणि पत्नीत सतत वाद 

घडलेल्या घटनेनुसार, नौहथिया येथील रहिवासी पती मनोज रजवार आणि पत्नी वसंती देवी यांच्यात सतत कौटुंबिक वाद निर्माण व्हायचा. अशातच एकदिवस पत्नी वसंती ही जेवण बनवताना पुन्हा दोघांमध्ये चांगला वाद झाला. त्यानंतर नवरा मनोजने पत्नीला विजेचा करंट दिला, नंतर तिच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला आणि तिची हत्या केली. 

नवऱ्याने बायकोला संपवलं अन् स्वत:वरही केले वार 

पत्नीच्या हत्येनंतर आरोपी मनोजने जीवन संपवण्यासाठी चाकूने स्वत:वर अनेकदा वार केले, ज्यात तो गंभीर जखमी झाला. स्थानिक लोकांनी सांगितलं की, मृत महिला वसंती देवी आणि मनोज यांना नऊ मुलं आहेत, ज्यात दोन मुलांचा विवाह झाला होता. आईची निर्घृणपणे हत्या आणि रुग्णालयात वडील जखमी आहेत. अशातच सात लहान मुले आणि कुटुंब यांची अवस्था वाईट असून ते सतत रडत आहेत.

हे ही वाचा : नांदेडमध्ये नातेवाईकांचा वाद, भांडण सोडवण्यास गेलेल्या तरुणाला संपवलं; 12 जण अटकेत

शुक्रवारी सकाळी कुटुंबियांनी आणि ग्रामस्थांनी घटनेची माहिती मिळाली, त्यानंतर तात्काळ पोलिसांना सूचित करण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी मनोजला अटक केली आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी वसंती देवीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला होता. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून हत्येमागील मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.