तारीख अन् वेळ ठरली, गोकुळसाठी आता रस्त्यावरची लढाई; सरकारच्या निर्णयाविरोधात सतेज पाटलांचा संघर्षमोर्चा

गोकुळमध्ये अध्यक्षपदाच्या निवडीसाठी गणपूर्ती पूर्ण होत नसल्याने सहकार कायद्यात सरकारने बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात संघर्षमोर्चा काढणार असल्याच सतेज पाटील यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

Satej Patil Press Conference
Satej Patil Press Conference
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

गोकुळसाठी सरकारच्या निर्णयाविरोधात रस्त्यावरची लढाई

point

सतेज पाटील काढणार संघर्षमोर्चा

Satej Patil Press Conference : 'सरकारने तमाम कोल्हापूरकरांचा अपमान केला असून त्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. माझ्या घरातील कोण उभा राहिलं नव्हतं. मला थांबवण्याचा हा प्रयत्न असू शकतो. मात्र त्यापेक्षा या मंडळींनी कोल्हापूरकरांचा अपमान केलला आहे' असं सतेज पाटील म्हणाले. गोकुळमध्ये अध्यक्षपदाच्या निवडीसाठी गणपूर्ती पूर्ण होत नसल्याने सहकार कायद्यात सरकारने बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविषयी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरकारच्या निर्णयाविरोधात कोल्हापुरात संघर्षमोर्चा काढणार असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं.

कोल्हापुरचा संघर्षमोर्चा

ते म्हणाले की, 'सरकारच्या या निर्णयाविरोधात 9 (नोव्हेंबर) तारखेला सकाळी 10 वाजता कोल्हापुरातील दसरा चौक येथून कोल्हापूरचा संघर्षमोर्चा हा मोर्चा आम्ही काढणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा आहे. न्यायालयीन लढाई तर आम्ही करुच; परंतु रस्त्यावरची लढाई करायला आम्ही मागं पडणार नाही. माझी तमाम कोल्हापुरकरांना विनंती आहे की हा अपमान निवडून दिलेल्या तेरा लोकांचा आहेच, बंटी पाटलाचा आहेच; परंतु अख्ख्या कोल्हापुरकरांचा हा अपमान आहे. कोल्हापुरकरांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. त्यामुळं सगळ्या कोल्हापुरकरांनी या मोर्चात सहभागी व्हावं.'

हे ही वाचा : "मतं चोरणाऱ्यांनो, शेतकरी काहीच विसरत नाहीत.." 'गोकुळ'वरुन राहुल गांधी आक्रमक, सहकार कायद्यातील दुरुस्तीबद्दल काय म्हणाले?

'कॅबिनेटमधील काळा दिवस'

सहकार कायद्यातील बदलाविषयी ते म्हणाले की, 'महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेटने महाराष्ट्रातील जनतेच्या मतांची लोकशाही संपवण्याचा निर्णय कॅबिनेटने घेतला. फक्त गोकुळला केंद्रबिंदू मानून हा कायदा करण्यात आला. उद्या कदाचित त्याचा ऑर्डिनन्स निघेल. यातून साखर कारखाने, जिल्हा बँका वगळल्या जातील आणि फक्त गोकुळमध्ये सत्ता मिळवण्यासाठी, कोल्हापुरकरांनी आमच्या बाजूने दिलेला कौल नाकारायचं काम सरकार करत आहे. याचा निषेध तर आम्ही करतोच, पण कालचा दिवस हा महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील काळा दिवस असणार आहे.'

हे ही वाचा : तुळजापूर हादरले! 18 वर्षीय विद्यार्थ्याची निर्घृण हत्या, माजी नगराध्यक्षासह दोघांना अटक

मुश्रीफांना मुख्यमंत्र्यांची भीती

राहुल गांधी यांनी ट्विट करुन भाजप दूध उत्पादकांची मतं चोरत असल्याचा आरोप केला. त्यावर हसन मुश्रीफ यांनी राहुल गांधी यांना विषय समजला नसल्याचं म्हटलं. त्याविषयी विचारले असता सतेज पाटील म्हणाले की, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याबद्दल त्यांचं (हसन मुश्रीफ) मत काय आहे हे मला माहिती आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या भीतीमुळं ते उघड बोलू शकणार नाहीत.'