19 वर्षीय मुलीला नोकरासोबत रुममध्ये पाहिलं, संतापलेल्या मालकाने जागेवरच सगळं संपवलं
बेंगलोरमधील एका व्यक्तीने आपल्या नोकराची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. नोकराला मुलीसोबत रुममध्ये बघितल्याने मालकाने संतापाच्या भरात ही हत्या केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मालकाने केली नोकराची हत्या
मुलीसोबत रुममध्ये बघितलं अन् संतापला
कट रचून हत्या केल्याचा आरोप
Crime News : एका 22 वर्षीय तरुणाची त्याच्याच मालकाने बेदम मारहाण करून हत्या केल्याची अत्यंत खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. बेंगळुरूच्या येलहंका परिसरात ही घटना घडली. किरण असे या मृत तरुणाचे नाव असून तो मूळचा केरळच्या पलक्कड जिल्ह्याचा राहणारा होता. गेल्या अनेक वर्षांपासून तो आनंदराज नावाच्या 45 वर्षीय व्यावसायिकाच्या कारखान्यात काम करत होता. स्वीट कॉर्न बनवणाऱ्या मशीन आणि ठेले तयार करणाऱ्या याच कारखान्यात किरण काम करत असताना, आनंदराजच्या 19 वर्षीय मुलीशी त्याचे प्रेमप्रकरण जुळले. संबंधित तरुणी दुसऱ्या शहरात शिक्षण घेत असून ती सध्या सुट्टीसाठी घरी आली होती आणि याच नात्यामुळे या भीषण हत्याकांडाची पार्श्वभूमी तयार झाली.
मुलीसोबत रुममध्ये नोकराला पाहिलं अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (3 नोव्हेंबर) सकाळी आनंदराज आणि त्याची पत्नी दिवसभर बाहेर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले होते. मात्र, काही तासांनंतर ते अचानक घरी परतले असता, त्यांना किरण त्यांच्या मुलीच्या खोलीत आढळला. या दृश्याने संतापलेल्या नराधम मालकाने अत्यंत टोकाचे पाऊल उचलत आधी आपल्या मुलीला एका नातेवाईकाकडे पाठवून दिले आणि त्यानंतर बंद खोलीत किरणला मारहाण केली. या अमानुष मारहाणीत किरण गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला. त्याला तत्काळ उपचारासाठी जवळील रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
हे ही वाचा : Maharashtra Weather: महाराष्ट्रात हवामानात मोठा बदल! कुठे पावसाच्या सरी, कुठे कोरडं वातावरण?
प्रकरणाला मिळाले वेगळे वळण
या संपूर्ण प्रकरणाला एक मोठे वळण तेव्हा मिळाले जेव्हा मृताच्या मामेभावाने अत्यंत गंभीर आरोप समोर आणले. प्रसाद नावाच्या या भावाचा दावा आहे की, ही कोणतीही तात्कालिक वादातून झालेली घटना नसून पूर्वनियोजित कट होता. हत्येच्या नेमक्या आधी आरोपी आनंदराजने किरणच्या भावाला डिलिव्हरीच्या कामासाठी उत्तर प्रदेशला पाठवून दिले होते, जेणेकरून हत्येच्या वेळी किरणच्या बचावासाठी किंवा मदतीसाठी कोणीही जवळ असावे लागू नये. या सुनियोजित षड्यंत्रामुळे या घटनेची व्याप्ती आणखीनच वाढल्याचे दिसून येत आहे.
हे ही वाचा : Personal Finance: मुंबई-पुण्यासारख्या शहरांच्या विकासासाठी पैसे गुंतवा, व्याजही मिळवा!
पूर्विनियोजित हत्या?
या प्रकरणी पोलिसांनी माहिती दिली की, आरोपी व्यावसायिक आनंदराजला पोलिसांनी तात्काळ अटक केली असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासातून हा खून पूर्वनियोजित असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. या घटनेत आनंदराजव्यतिरिक्त इतर कोणाचा सहभाग होता का किंवा हत्येच्या वेळी घरात आणखी कोणी उपस्थित होते का, या सर्व बाजूंचा कसून तपास पोलीस करत आहेत. एका प्रेम प्रकरणातून मालकाने केलेल्या या अमानवी कृत्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
