राहुल गांधींच्या टीकेवर नरेंद्र मोदींची शायरी, 'दुनिया को धोका दोगे...'

मुंबई तक

PM Narendra Modi : संसदेच्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेस खासदार आणि नेते राहुल गांधी यांनी  माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा हवाला दिला. या पुस्तकातील मजकूर वाचून भारत - चीनमधील संघर्षावरून केंद्र सरकारचे कान टोचले. यावरून  नरेंद्र मोदी यांनी शायरी म्हणत काँग्रेस आणि राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं आहे.

ADVERTISEMENT

PM Narendra Modi
PM Narendra Modi
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नेमकं काय म्हणाले नरेंद्र मोदी? 

point

काय म्हणाले होते राहुल गांधी? 

PM Narendra Modi : संसदेच्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेस खासदार आणि नेते राहुल गांधी यांनी  माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा हवाला दिला. या पुस्तकातील मजकूर वाचून भारत - चीनमधील संघर्षावरून केंद्र सरकारचे कान टोचले. यावरून  नरेंद्र मोदी यांनी 'काँग्रेस पक्षाला कोणताही विचार नाही आणि कोणतीही इच्छाशक्ती नाही', असं म्हणत 5 जानेवारी रोजी संसदेत प्रत्युत्तर दिलं. त्यांच्या याच प्रत्युत्तराची सध्या जोरदार चर्चा होताना दिसतेय.  नरेंद्र मोदी एवढ्यावरच न थांबता त्यांनी शायरी म्हणत अनेकांचं लक्ष्य आपल्याकडे वेधून घेतलं. 

हे ही वाचा : जळगाव: जंगलात आढळला अर्धवट जळालेल्या अवस्थेतील महिलेचा मृतदेह... परिसरात खळबळ

नेमकं काय म्हणाले नरेंद्र मोदी? 

अर्थसंकल्पानंतर राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकातील काही उल्लेख करत भारत-चीनमधील संघर्षावरून केंद्र सरकारवर हल्ला चढवला होता. त्यावर नरेंद्र मोदी यांनी एक शायरी म्हणत काँग्रेसला सुनावलं. 

नरेंद्र मोदींची शायरी...

'इतना दुनिया को धोका दोगे
आइना देख लिया तो अपणी सच्चाई कहा छुपाओगे',
असं म्हणत त्यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं होतं.

नंतर ते म्हणाले की, 'आज देशात डिलची चर्चा झाल्यानंतर गौरव होतो, तत्कालीन परिस्थितीत डिलबाबत बोलायचं झाल्यास बोफर्स डिलची चर्चा व्हायची. त्यांनी (काँग्रेसनं) केवळ आपले खिस्से भरण्याचं काम केलं. नागरिकांच्या जीवनात बदल घडवणे हे त्यांच्या प्राथमिकतेत नव्हते', असं नरेंद्र मोदी म्हणाले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp