पुण्यात निलेश घायावळ गँग सक्रीय? तरुणावर सपासप वार, व्हिडिओ व्हायरल
Pune Crime : पुणे शहराला संस्कृतीचं शहर मानले जाते, मात्र आता हेच शहर गुन्हेगारीचं हॉट्सस्पॉट ठरलेलं आहे. शहरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि कोयते हल्ला होऊ लागले आहेत. अशातच कोथरूड येथे एका तरुणावर हल्ला केल्याचं चित्र आहे. संबंधित हल्लेखोर हा निलेश घायावाळ टोळीचा असल्याचा संशय आहे. यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
ADVERTISEMENT

पुण्याच्या कोथरूड येथे तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता, या घटनेनं पुणे हादरून गेला आहे. ही घटना पोलीस ठाणे परिसरात घडल्याची माहिती आहे. हल्लेखोर गुंड हा निलेश घायावळ यांच्या टोळक्यातील असल्याचं बोललं जातंय. संबंधित प्रकरणाचा CCTV व्हायरल झाला आहे. घरगुती वादातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.