पेट्रोलमध्ये आता इथेनॉलचं मिश्रण, त्यात सुद्धा भेसळ; उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर घणाघात
uddhav thackeray interview : पेट्रोलमध्ये आता इथेनॉलचं मिश्रण आहे. दानपेटी फोडली जाते फोडली म्हणजे लुटली जाते, असं म्हणत शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केलीये.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पेट्रोलमध्ये आता इथेनॉलचं मिश्रण, त्यात सुद्धा भेसळ;
उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर घणाघात
uddhav thackeray interview : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत जंतरमंतरवरील आंदोलन, नीट पेपरफुटी प्रकरण आणि राम मंदिरातील कथित दानपेटी गैरव्यवहार या मुद्द्यांवर मोदी सरकारवर जोरदार टीका केली. दिल्लीतील जंतरमंतरवर उसळलेले आंदोलन हे केवळ नीट पेपरफुटीविरोधातील नसून गेल्या अनेक वर्षांपासून देशातील जनतेची झालेली फसवणूक, बेरोजगारी आणि तरुणांमधील वाढत्या असंतोषाचा उद्रेक झाला. आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांमध्ये देश वाचवण्याची भावना असून त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचेही उद्धव ठाकरेंनी सांगितले. सरकारला व्यवस्था चालवता येत नसल्याचा आरोप करत देशभरात जनतेचा संताप वाढत असल्याचेही ठाकरे म्हणाले.
हेही वाचा : Inside Story: CM फडणवीसांना तडकाफडकी बोलावलं दिल्लीला, पण या मीटिंगची आतली कहाणी भलतीच!
'राम मंदिराची पेटी दानपेटी लुटली जाते'
उद्धव ठाकरे म्हणाले, 2014 पासून एका भोळ्या अपेक्षेने भाबडेपणाने ज्यांना पाठिंबा दिला त्यांनीच पाठीत वार केल्याची भावना या जनतेच्या मनात आहे. प्रत्येक ठिकाणी यांच्या नकार घंटाच मिळतायत. रोजगार मिळत नाहीये. महागाई कमी होत नाही. पेट्रोलचे भाव कमी झालेत का? गॅसचे भाव कमी झाले का? पेट्रोलमध्ये आता इथेनॉलचं मिश्रण म्हणजे त्याच्यात सुद्धा भेसळ व्हायला लागलेली आहे. रस्त्यावरती खड्डे पडतायत आहे. पूल पडतायत, पक्ष फोडले जाता आहेत. दानपेट्या म्हणजे राम मंदिराची पेटी दानपेटी फोडली जाते फोडली म्हणजे लुटली जाते. पेपर फुटतायत या सरकारला कशाशीच काही पडलेल नाहीये.
