लातूरात लव्ह ट्रँगल, प्रेयसीचा स्क्रू ड्रायव्हरने चिरला गळा

Latur Crime News : लातूर येथून मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक लव ट्रँगलचा प्रकार उघडकीस आलाय. प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या गळ्यावर स्क्रू ड्रायव्हरने हल्ला केला. लातूर शहरातील गोकुलधाम सोसायटीतील ही दुर्दैवी घटना आहे.

ADVERTISEMENT

Latur Crime News
Latur Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

लातूर येथून मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक लव ट्रँगल

point

शाळेतील जून्या मित्रासोबत प्रेमसंबंध

point

महिलेचा आवळला गळा 

Latur Crime News : अनिकेत जाधव - लातूर येथून मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक लव ट्रँगलचा प्रकार उघडकीस आलाय. प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या गळ्यावर स्क्रू ड्रायव्हरने हल्ला केला. लातूर शहरातील गोकुलधाम सोसायटीतील ही दुर्दैवी घटना आहे. या घटनेनं आता पूरतं लातूर शहर हादरून गेले आहे. मृत प्रेयसी तरुणीची ओळख शीतल गायमुखे (वय 26) अशी ओळख समोर आली. तर दुसरीकडे प्रियकराची रमजान चांद पाशा शेख (वय 25) अशी ओळख समोर आली. 

हे ही वाचा : Astrology : बुधादित्य योग आणि नवरात्रीच्या सप्तमीचा प्रभाव, 'या' राशींना मिळणार लाभ

शाळेतील जून्या मित्रासोबत प्रेमसंबंध

दहा वर्षांपूर्वी शितल नावाच्या तरुणीचे अहमदपूर तहसील परिसरातील धामणगाव येथील एका तरुणाशी विवाह झाला होता. लग्नानंतर एकाच वर्षात शितलने आपल्या नवऱ्याकडून तलाख घेतला. शितलला एक मुलगी देखील होती. तलाखनंतर ती मुलगी शीतलजवळच राहत होती. ती नंतर पुण्याहून लातूरला राहण्यास गेली होती, अशातच तिचे शाळेतील एका जून्या मित्रासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. एवढंच नाहीतर तिला रमजान चांद पाशा शेख नावाची व्यक्ती ऑटो ड्रायव्हर देखील आवडू लागली होती. 

महिलेचा आवळला गळा 

जेव्हा रामजानसोबत तरुणीचे प्रेमसंबंध सुरु झाले असता, ते दोघेही नवरा बायकोप्रमाणे एकमेकांसोबत राहू लागले होते. रमजानसोबत काही दिवस राहून महिला पुन्हा सागरसोबत बोलू लागली होती. या प्रकरणाची माहिती रमजानला मिळाली होती. याच रागातून रमजान शीतलला घेऊन गोकुलधाम सोसायटीच्या एका मोकळ्या जागेवर घेऊन गेला होता, तेवढ्यात त्याने तिचा गळा दाबून संपवलं. 

हे ही वाचा : 'आंतरराष्ट्रीय डंका वाजवण्याची वेळ...' लंडनमधून ध्रुव राठीची हाक; कधी होणार आंदोलन?

या घटनेत आरोपी रमजान चांद पाशा शेख विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 103 (1) अंतर्गत एमआयडीसी पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आली. नंतर आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. संबंधित प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.