Astrology : बुधादित्य योग आणि नवरात्रीच्या सप्तमीचा प्रभाव, 'या' राशींना मिळणार लाभ
Astrology : आजच्या शनिवारी अश्विन शुक्ल पक्ष सप्मती तिथी असणार आहे. तसेच आजच नवरात्रोत्सवाचा सातवा दिवस आहे. या काळात देवी मातेच्या पूजेला अनन्य साधारण महत्त्व आहे. पंचांगानुसार, चंद्र ग्रह हा धनु राशीत राहणार असून, तर सूर्य ग्रह हा कन्या राशीतून तुळ राशीत संक्रमण करणार आहे. सायंकाळी सूर्य - बुध ग्रहांच्या युतीमुळे बुधादित्य राजयोगाची निर्मिती होणार आहे. या ग्रहांचा संबंधित राशीतील लोकांच्या कामाची गती, आर्थिक व्यवहार आणि काही राशींसाठी सकारात्मक संधीचे संकेत आहेत.
ADVERTISEMENT

1/5
आजच्या शनिवारी अश्विन शुक्ल पक्ष सप्मती तिथी असणार आहे. तसेच आजच नवरात्रोत्सवाचा सातवा दिवस आहे. या काळात देवी मातेच्या पूजेला अनन्य साधारण महत्त्व आहे. पंचांगानुसार, चंद्र ग्रह हा धनु राशीत राहणार असून, तर सूर्य ग्रह हा कन्या राशीतून तुळ राशीत संक्रमण करणार आहे. सायंकाळी सूर्य - बुध ग्रहांच्या युतीमुळे बुधादित्य राजयोगाची निर्मिती होणार आहे. या ग्रहांचा संबंधित राशीतील लोकांच्या कामाची गती, आर्थिक व्यवहार आणि काही राशींसाठी सकारात्मक संधीचे संकेत आहेत.

2/5
वृषभ
आजचा दिवस या राशीच्या लोकांसाठी उत्साह आणि सकारात्मक राहणार आहे. कुटुंबासोबत आनंदाचा वेळ जाईल. आर्थिक बाबतीत चांगला दिवस असेल. व्यवसायात लाभ आणि नोकरीत सकारात्मक बातमी मिळू शकते, फक्त फसवणुकीदारांपासून सावधानता बाळगावी.

3/5
मेष
आजचा दिवस यश आणि नवीन संधी निर्माण करणारा आहे. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आपल्या मेहनतीचे कौतुक होईल. तसेच व्यावसायिकांना नफा कमावण्याची देखील संधी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात शुभ कार्याचे नियोजन होऊ शकते. भावनांवर नियंत्रण ठेवा णि पालकांच्या आशीर्वादाने दिवसाची सुरुवात होईल.

4/5
वृश्चिक
वृश्चिक राशीतील लोकांसाठी आजचा दिवस आनंद आणि उत्साहाने भरलेला असणार आहे. तसेच कुटुंबासोबत आजचा दिवस चांगला जाणार आहे. नोकरीत आर्थिक लाभ मिळणार आहे, तसेच नवीन जबाबदारी किंवा सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता आहे.

5/5
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांनी आपल्या कामाच्या क्षेत्रात नफा आणि यश मिळवण्याची चांगली संधी आहे. नोकरीत प्रशंसा, नवीन जबाबदारी किंवा पदोन्नतीची शक्यता आहे. जबाबदाऱ्या वाढल्याने ताण जाणवेल.
