पुणे, बारामती आणि कोल्हापुरात पावसाचा कहर, एका रात्रीत चित्र बदललं, कुठे विक्रमी नोंद?

Maharashtra Rain : दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या बारामतीत आता मध्यरात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत शहरात तब्बल 158 मिमी पावसाची नोंद झाली. बारामतीच्या ग्रामीण भागात देखील पिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र, या झालेल्या पावसामुळे काही भागांत शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान निर्माण झाले आहे. 

ADVERTISEMENT

Maharashtra Rain
Maharashtra Rain
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

बारामतीत सखल भागांत पाणी साचलं

point

नगराध्यक्षांचं नागरिकांना आवाहन 

Maharashtra Rain : वसंत जाधव - दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या बारामतीत आता मध्यरात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत शहरात तब्बल 158 मिमी पावसाची नोंद झाली. बारामतीच्या ग्रामीण भागात देखील पिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र, या झालेल्या पावसामुळे काही भागांत शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान निर्माण झाले आहे. 

हे ही वाचा : Astrology : 'या' राशीला व्यवसायत मिळणार नफा,12 राशींची स्थिती काय?

बारामतीत सखल भागांत पाणी साचलं

बारामतीच्या काही सखल भागांत पाणी साचल्याने शहरातील रस्ते आता पाण्याखाली गेले आहे. काही सखल भागांत पाणी साचल्याने वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. भिगवन येथे काही सखल भागांत पाणी शिरले होते. याच ठिकाणी काही काळ वाहतूक सुविधा ही ठप्प राहिली होती. 

नगराध्यक्षांचं नागरिकांना आवाहन 

अशातच नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा सतर्क झालेली आहे. पाणी साचून अडथळा निर्माण झालेल्या ठिकाणी अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहून काम करत आहेत. पोलीस प्रशासनही नागरिकांना मदत करताना दिसत आहेत. नागरिकांनी पावसाचा जोर कमी होईपर्यंत कोणीही घराबाहेर न पडण्याचे आवाहन स्थानिक प्रशासन करत आहे. बाहेर पडावं लागल्यास योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन नगराध्यक्षांनी केले आहे. 

हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यात पावसाचा अलर्ट, पुन्हा वादळ घोंगावणार; IMD चा अलर्ट

पुणे आणि कोल्हापूरमध्ये पावसाचा हाहाकार 

ग्रामीण पुण्यासह आता पुणे शहरातही पावसाने चांगली हजेरी लावली आहे. तसेच कोल्हापूरमध्ये देखील पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अर्णब चक्रीवादळाचा परिणाम हा राज्यातील काही भागांत दिसून येत आहे. त्यापैकी पुणे आणि सातारा जिल्ह्यांत चांगल्या पावासाची स्थिती पाहायला मिळत आहे.