वाशिम : चारित्र्यावर संशय, पत्नी झोपेत असताना पतीकडून कुऱ्हाडीचे वार; जागेवर संपवलं

Washim Crime News : वाशिमच्या जऊळका गावात पतीने पत्नीची झोपेत असताना कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना घडली. घटनेनंतर अवघ्या चार तासांत पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली.

ADVERTISEMENT

Washim Crime News
Washim Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

वाशिम : चारित्र्यावर संशय घेतल्याने वाद

point

पत्नी झोपेत असताना पतीकडून कुऱ्हाडीचे वार; जागेवर संपवलं

Washim Crime News, जका खान : वाशिम जिल्ह्यातील जऊळका गावात पतीने पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. चारित्र्यावर संशय घेऊन पतीकडून वारंवार वाद घातले जात असल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या चार तासांत आरोपी पतीला अटक केली आहे. शारदा जोंधळे (वय 35) असं मृत महिलेचं नाव असून पोलिसांनी तिचा पती दिनेश जोंधळे (वय 39) याला अटक केलीये. ही घटना 1 नोव्हेंबरची रोजी पहाटेच्या सुमारास घडली.

हेही वाचा : Maharashtra Weather : राज्यात पावसाचा अलर्ट, पुन्हा वादळ घोंगावणार; IMD चा अलर्ट

पत्नी झोपेत असताना पत्नीकडून कुऱ्हाडीने वार 

अधिकची माहिती अशी की, वाशिम जिल्ह्यातील जऊळका गावात दिनेश जोंधळे (वय 39) हा पत्नी शारदा जोंधळे (वय 35) हिच्यासोबत राहत होता. जऊळका पोलीस ठाण्याचे ठाणेदार गणेश हिवरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असत. 1 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास या वादातून दिनेशने पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास शारदा झोपेत असताना दिनेशने तिच्या गळ्यावर कुऱ्हाडीने जोरदार वार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शारदाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर दिनेश घटनास्थळावरून निघून गेला.

हेही वाचा : इंडिया आघाडीच्या महारॅलीची भव्य सुरुवात, राहुल गांधी रामलीला मैदानाकडे रवाना, दिल्लीत काय घडतंय?

शारदा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली अन्...

1 नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजेपर्यंत पती-पत्नीच्या खोलीचा दरवाजा उघडला नव्हता. त्यामुळे समोरच्या घरात राहणाऱ्या मुलगा आणि मुलीने घरात जाऊन पाहिले. त्यावेळी शारदा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली, तर त्यांचे वडील खोलीत नव्हते. हे दृश्य पाहून मुलांना धक्का बसला. त्यांनी तातडीने जऊळका पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच ठाणेदार गणेश हिवरकर हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पाहणी केली असता शारदा यांच्या गळ्यावर खोल जखम असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वाशिम येथे पाठवला. या घटनेचा तपास सुरू असताना आरोपी दिनेशचा मोबाईल बंद असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक रवाना करण्यात आले.

पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी दिनेशचा शोध सुरू केला. अखेर तो शेजारील मालेगाव शहरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तिथे जाऊन दिनेशला ताब्यात घेतले. घटनेनंतर अवघ्या चार तासांत पोलिसांनी त्याला अटक केली. दिनेश हा मजुरीचे काम करत असल्याची माहिती आहे. पत्नीच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणी जऊळका पोलीस ठाण्यात आरोपी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. शारदा आणि दिनेश यांना दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन अपत्ये आहेत. त्यापैकी एका मुलीचे लग्न झाले आहे. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.