Maharashtra Weather : राज्यात पावसाचा अलर्ट, पुन्हा वादळ घोंगावणार; IMD चा अलर्ट
Maharashtra Weather : अर्णब चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात नव्याने चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागांत या चक्रीवादळाचा पुन्हा पावसाला पोषक असं वातावरण निर्माण होताना दिसतंय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अर्णब चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात नव्याने चक्रीवादळ
राज्यातील काही भागांत या चक्रीवादळाचा पुन्हा पावसाला पोषक वातावरण
Maharashtra Weather : अर्णब चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात नव्याने चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागांत या चक्रीवादळाचा पुन्हा पावसाला पोषक असं वातावरण निर्माण होताना दिसतंय. अशातच भारतीय हवामान विभागाने 2 नोव्हेंबर रोजी वर्तवलेल्या जिल्हानिहाय अंदाजानुसार, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यांत पावसाचा अंदाज वर्तवलाय, तर विदर्भात बहुतांश जिल्ह्यांना कोणताही इशारा वर्तवलेला नाही.
हे ही वाचा : 'ज्ञानेश कुमारांमुळे मोदी पंतप्रधान', मतचोरीवरून राहुल गांधींची बोचरी टीका
कोकण
कोकणातील पालघर, ठाणे आणि मुंबईत हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे, या दोन्ही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट वर्तविलेला आहे. तर रायगड जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार आणि जाळगाव जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे नाशिक जिल्हा, नाशिक घाटमाथा परिसरात मेघगर्जनेसह सरी कोसळण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा आणि सातारा जिल्ह्यांत विजांसह कडकडाट जाणवेल, हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे, त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे.
मराठवाडा
मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि हिंगोली जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. नांदेड आणि लातूर जिल्ह्यांत हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यात वादळी सरींचा अंदाज आहे.
हे ही वाचा : लातूर: फ्लॅटमध्ये 3 पुरूष आणि तरुणी, पोलिसांकडून देह व्यापार रॅकेटचा भांडाफोड
विदर्भ
अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान विभागाने कोणताही अलर्ट वर्तविलेला नाही.
