'ज्ञानेश कुमारांमुळे मोदी पंतप्रधान', मतचोरीवरून राहुल गांधींची बोचरी टीका
Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी दिल्लीच्या रामलिला मैदानावर उपस्थित आदोलकांना संबोधित करून सरकारवर हल्लाबोल केला, त्यांनी यावेळी बोलताना सरकारसह अदाणींवर देखील हल्लाबोल चढवला होता, नेमकं ते काय म्हणाले ते पुढीलप्रमाणे..
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अदाणींसह अमित शाहा, नरेंद्र मोदी आणि ज्ञानेश कुमारवर हल्लाबोल
'हाच तुमच्यातील आणि आमच्यातील फरक'
Rahul Gandhi : "ही केवळ साधारण चोरी नाहीये, कोणीतरी दुकानातून चोरी केल्यास त्याला लगेच अटक केली जाते. मात्र, व्होटचोरी ही कोणतीही सामान्य चोरी नाहीये. भारतातील प्रत्येक नागरिकांच्या आवाजाची चोरी करण्यात आली आहे, याला देशद्रोह असं म्हणतात. याच ज्ञानेश कुमारशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले असते, ना अमित शाहा देशाचे गृहमंत्री झाले असते. आरएसएसने या देशातील सर्वच संस्थाना ताब्यात घेतलं आहे. एवढंच नाही,तर नरेंद्र मोदी, अमित शाहा आणि ज्ञानेश कुमार यांना रात्रीची झोप लागत, नाही कारण त्यांची झोप उडवली आहे," असे म्हणत राहुल गांधी यांनी दिल्लीच्या रामलिला मैदानावर उपस्थित आदोलकांना संबोधित करून सरकारवर हल्लाबोल केला.
हे ही वाचा : पत्नीचे अफेयर अन् सासूचा लेकीला पाठिंबा, संशयातून जावयाचा महिलेवर गोळीबार
अदाणींसह अमित शाहा, नरेंद्र मोदी आणि ज्ञानेश कुमारवर हल्लाबोल
पुढे राहुल गांधी म्हणाले की, "शैक्षणिक विभाग, आरोग्य विभाग, ईडी, सीबीआय, पोलीस या संस्था किंवा हे विभाग आरएसएस आणि भाजपने ताब्यात मिळवलेत. पण ही त्यांची संस्था नसून हे विभाग या देशातील तरुणांच्या हक्काचे आहेत. याचा परिणाम हा शेतकरी, मजुर आणि तरुणांच्या हक्कांवर होतोय. देशातील धन हे अंबानी, अडाणी यांना देण्यात आले आहेत, त्यांचे सर्व स्वप्न पूर्ण होतात आणि कर्ज देखील माफ केले जाते. मात्र, दुसरीकड़े शेतकरी, मजुरादार, एखादा जोडधंदा करणारा व्यक्ती जेव्हा बँकेतून पैसे मागतात, त्यांना ते पैसे परत न करता आल्यास त्यांना तुरुंगात टाकले जाते. असा भारत आम्हाला नको, आपण असा भारत स्वीकारायचा नाही. मोबाइल फोन अडानीचा, कंट्रक्शन अडाणीचे, शैक्षणिक संस्था अडाणीच्याच, विमानतळ देखील अडाणींचेच. जर सर्वच गोष्टी अडाणींना द्यायचे असल्यास आम्ही हे होऊ देणार नाही", असं राहुल गांधी म्हणाले.
"..तरच देशाला न्याय मिळेल"
त्यानंतर ते म्हणाले की, "देशाला एका व्यवस्थित ट्रॅकवर आणायचे असल्यास या ज्ञानेश कुमारला हटवायचे आहे. अमित शाहाने सांगितलं की, नरेंद्र मोदी कुठेही जाणार नाहीत, पण मी सांगतो, नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांच्याविरोधात अधिकृत कारवाई करता येईल, तरच देशाला न्याय मिळण्याची शक्यता आहे," असं राहुल गांधी म्हणाले.
'हाच तुमच्यातील आणि आमच्यातील फरक'
"जी तुम्ही व्होट चोरी केली, अडाणीला देश विकला आहे तर हाच देश तुमच्याकडे न्याय मागेल, तुम्ही कुठे पळून जाऊ नका. नरेंद्र मोदी, अमित शाहा आणि ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाई होणार म्हणजे होणार. या देशात कोणावर राग केला जात नाही, माझ्यासाठी आमित शाहा, नरेंद्र मोदी आणि ज्ञानेश कुमार कोणीच दुश्मन नाही. आमच्यासाठी धर्माहून अधिक महत्त्वाची बाब देशातील प्रत्येक नागरिकांचा आवाज आहे. देशातील प्रत्येक व्यक्तीचा आवाज बुलंद व्हावा हाच माझा धर्म आहे. हाच तुमच्यातील आणि आमच्यातील एक फरक आहे."
हे ही वाचा : '..म्हणून संजय राऊत बाळासाहेबांना आवडत नव्हते', राज ठाकरेंनी सांगितला 'तो' किस्सा
"नरेंद्र मोदी, अमित शाहा आणि आरएसएसने या देशात केवळ द्वेष पसरवला आहे. देश ओरडतोय की, आम्हाला द्वेष नको केवळ प्रेम हवंय. पण ज्ञानेश कुमारने गुन्हा केला आहे, त्यामुळे ते रात्री झोपत नाहीत, त्यांना झोप येत नाही. त्यांनी देशाचा गळा दाबला आहे. ज्ञानेश कुमारच नाही,तर नरेंद्र मोदी आणि अमित शाहा या दोघांच्या झोपा उडालेल्या आहेत," असं म्हणत त्यांनी उपस्थित झालेल्यांचे अभार मानले आणि भाषणाची सांगता केली.
