'..म्हणून संजय राऊत बाळासाहेबांना आवडत नव्हते', राज ठाकरेंनी सांगितला 'तो' किस्सा

Sanjay Raut Bodhkirtan Book Release : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांचे बोधकिर्तन नावाचे पुस्तक 31 ऑक्टोबर रोजी प्रकाशित झाले. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यक्रमादम्यान उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि संजय राऊत यांच्यातील मुलाखतीचा आगळावेगळा किस्सा सांगितला.

ADVERTISEMENT

Sanjay Raut Bodhkirtan Book Release
Sanjay Raut Bodhkirtan Book Release
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

"गँगवॉरच्या गोष्टींमुळे संजय राऊत प्रसिद्ध"

point

'संजय राऊत यांनी अनेकदा शिवसेनेवरती देखील टिका केल्या होत्या'

Sanjay Raut Bodhkirtan Book Release : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांचे बोधकिर्तन नावाचे पुस्तक 31 ऑक्टोबर रोजी प्रकाशित झाले. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यक्रमादम्यान उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि संजय राऊत यांच्यातील मुलाखतीचा आगळावेगळा किस्सा सांगितला. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "सर्वाधिक संबंध आला तो माझ्या वडिलांसोबत आणि नंतर बाळासाहेबांसोबत आला. चित्रपट लेखक दिलीप ठाकूर आणि संजय राऊत यांनी अनेकदा माझ्या वडिलांच्या शिव्या देखील खाल्ल्या आहेत. नंतर मग त्यांची आणि माझी देखील मैत्री वाढत गेली. एकमेकांशी भेटत गेलो आणि बोलत गेलो होतो", असं राज ठाकरे म्हणाले. 

हे ही वाचा : सांगली: मतिमंद मुलीवर घरात घुसून लैंगिक अत्याचार, बाप-लेकाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

"गँगवॉरच्या गोष्टींमुळे संजय राऊत प्रसिद्ध"

पुढे राज ठाकरे म्हणाले की, "संजय राऊत हे लोकप्रभा येथे काम करत होते, तेव्हा साधारण 1986-88 मध्ये मी लोकसत्ता येथे व्यंगचित्रकार म्हणून फ्रिलान्सर काम करत होतो. मी व्यंगचित्र घेऊन ऑफिसला जायचो, माधवराव गडकरी संपादक होते. इंडियन एक्सप्रेसच्या कॅन्टिनमध्ये गप्पा सुरु असायच्या, तर संजय राऊत प्रसिद्ध कशामुळे होते, तर गँगवॉरच्या गोष्टींमुळे. अप्रतिम लिहायचे ते आणि त्या खऱ्या गोष्टी असायच्या", असं म्हणत त्यांनी पुढे सामना वृत्तपत्राबाबत देखील माहिती दिली. 

हा कोणता सामना आहे?

सामना वृत्तपत्राचा किस्सा सांगताना राज ठाकरे म्हणाले की, "त्याचवेळी 1988-89 रोजी सामना आला होता, आमची चांगलीच मैत्री होती. आमचं चांगलं बोलणं व्हायचं. तेव्हा संजय राऊत म्हणाले की, हा कोणता सामना आहे? संपादक बाळ ठाकरे असं लिहिलेलं असून अशी मुळूमुळू भाषा असू शकेल का? बाळासाहेबांच्या वर्तमान पत्राला हे शोभून दिसतं का? असं आमचं बोलणं सुरूच असायचं", असं राज ठाकरेंनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

हे ही वाचा : Govt Jobs : ONGC मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु, कोणत्याही परीक्षेशिवाय होणार निवड...; लगेच करा अर्ज

'संजय राऊत यांनी अनेकदा शिवसेनेवरती देखील टिका केल्या होत्या'

"संजय राऊत यांनी अनेकदा शिवसेनेवरती देखील टिका केल्या होत्या, यावरून बाळासाहेब ठाकरे यांना त्यांची चिड यायची. मी एकदा संजय राऊत यांना मुलाखद द्या अशी विनंती केली, मात्र बाळासाहेबांनी नकार दिला, पण नंतर त्यांनी मुलाखतीसाठी होकार दिला होता. मुलाखत घेताना संजय राऊत यांना बाळासाहेबांना असे काही प्रश्न विचारले की, बाळासाहेबांनी त्यांना शिवीगाळ केली, नंतर मुलाखत रेकॉर्ड झाल्यानंतर बाळासाहेबांच्या शिव्या तशाच होत्या. हेच बाळासाहेबांना संजय राऊत यांचा गुण आवडला होता, त्यांनी म्हणून दाखवलं नाही, पण त्यांना वाटलं असेल की, बंदे मे दम है!", असं म्हणत राज ठाकरेंनी संजय राऊत यांचा पूर्वीचा बाळासाहेबांचा किस्सा सांगितला.