Govt Jobs : ONGC मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु, कोणत्याही परीक्षेशिवाय होणार निवड...; लगेच करा अर्ज
ONGC मध्ये प्रशिक्षणार्थी पदांसाठी मोठी भरती सुरु झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 नोव्हेंबर आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ONGC मध्ये विविध पदांची भरती
काय आहेत पात्रतेचे निकष?
ONGC Recruitment : ऑइल ॲण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनच्या (ONGC) देशभरातील 24 वर्क सेंटर्ससाठी तब्बल 3047 अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांची मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम (NAPS) आणि नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम (NATS) अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. दहावी, बारावी, आयटीआय (ITI), डिप्लोमा, तसेच B.A., B.Com., B.Sc., BBA आणि B.E./B.Tech. उत्तीर्ण असणारे पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
पात्रतेचे निकष काय?
या भरतीसाठी उमेदवारांचे वय 29 नोव्हेंबर 2026 रोजी 18 ते 24 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असून, नियमानुसार वयात सवलत लागू असेल. महत्त्वाचे म्हणजे, उमेदवारांची शैक्षणिक पात्रता 29 नोव्हेंबर पर्यंत उत्तीर्ण होऊन तीन वर्षांपेक्षा जास्त काळ झालेला नसावा. निवड झालेल्या उमेदवारांना 12 महिन्यांच्या प्रशिक्षणादरम्यान दरमहा 8,200 रुपये ते 12,300 रुपयांपर्यंत विद्यावेतन (Stipend) दिले जाईल.
हे ही वाचा : वाल्मिक कराडच्या मुलाचं सोलापुरातील 'ते' जुनं कांड; अखेर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
शैक्षणिक गुणवत्तेवर निवड
उमेदवारांची निवड कोणतीही परीक्षा न घेता केवळ त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर (Merit) आणि कागदपत्र पडताळणीवर केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना भारतातील विविध ONGC केंद्रांवर रुजू केले जाईल. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी पात्र उमेदवारांनी 20 नोव्हेंबर 2026 पर्यंत NAPS किंवा NATS च्या अधिकृत पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
हे ही वाचा : पुणे : 18 व्या मजल्यावरून खाली झेपावली आई अन् चिमुरडा लेक, हादरवून टाकणाऱ्या घटनेमागे नेमकं कारण काय?
'इथे' करा अर्ज
अधिक माहिती आणि सविस्तर जाहिरातीसाठी उमेदवारांनी ONGC च्या ongcindia.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. वेळेत अर्ज भरून या उत्तम संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
