पत्नीचे अफेयर अन् सासूचा लेकीला पाठिंबा, संशयातून जावयाचा महिलेवर गोळीबार

crime news : एका महिलेच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी आरोपी व्यक्तीला अटक केली आहे. बायको आणि तिचा प्रियकराचे प्रेमसंबंध सुरु असल्याचा मुकेशने संशय व्यक्त केला. मुकेश याला संशय होता की, सासू पत्नीला तिच्या प्रियकरासोबत भेटण्यासाठी मदत करते.

ADVERTISEMENT

crime news
crime news
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

सासूच पत्नीला तिच्या प्रियकरासोबत भेटण्यास मदत करत असल्याचा संशय

point

सासूवर जावयाकडून गोळीबार 

Crime News : एका महिलेच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी आरोपी व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जावई आरोपी मुकेश कुमार याने सासू उर्मिला देवी (वय 55) हिच्यावर गोळीबार करत तिची हत्या केली. बायको आणि तिचा प्रियकराचे प्रेमसंबंध सुरु असल्याचा मुकेशने संशय व्यक्त केला. मुकेश याला संशय होता की, सासू पत्नीला तिच्या प्रियकरासोबत भेटण्यासाठी मदत करते. हे प्रकरण बिहारच्या पाटना येथील एयरपोर्ट ठाणे क्षेत्रातील आहे. 

हे ही वाचा : Astrology : 'या' राशीतील लोकांच्या जीवनात प्रेम वाढेल, जाणून घ्या 12 राशींची स्थिती

रुग्णालयात काम करणाऱ्या सासूवर जावयाकडून गोळीबार 

29 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात काम करणाऱ्या उर्मिला देवीवर गोळीबार करून तिची हत्या करण्यात आली. गोळीबार करणाऱ्या आरोपीची ओळख तत्कालीन परिस्थितीत करण्यात आली नाही. पोलिसांनी तपास सुरु केला असता, उर्मिला देवीचा जावई मुकेश कुमारपर्यंत पोहोचली होती. 

सासूच पत्नीला तिच्या प्रियकरासोबत भेटण्यास मदत करत असल्याचा संशय

पोलिसांनुसार, 29 ऑक्टोबर रोजी उर्मिला देवीवर गोळीबार करण्यात आला होता. उर्मिला देवी एका रुग्णालयात काम करत होती. घटनेनंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला, प्रकरणाचे गांभीर्य ओळखून एक पथक तयार करण्यात आले होते. पोलिसांनी कोणाला काहीही न कळता तपास सुरु केला. यादरम्यान मुकेश कुमारचे नाव समोर आले. पोलिसांचे म्हणणे असे की, मुकेशच्या पत्नीचे इतर व्यक्तीशी अफेयर होते. त्याला वाटायचे की, सासूच पत्नीला तिच्या प्रियकरासोबत भेटण्यास मदत करायची. 

हे ही वाचा : '..म्हणून संजय राऊत बाळासाहेबांना आवडत नव्हते', राज ठाकरेंनी सांगितला 'तो' किस्सा

पोलिसांनी त्यानंतर एका फ्लॅटवर छापा टाकला असता, तपासादरम्यान फ्लटवर तब्बल 21 काडतूसे आढळून आले आणि एक चाकू आढळून आला. यानंतर पोलिसांनी 30 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरापर्यंत खगौल पोलीस ठाणे परिसरात मुकेश कुमारला अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, मुकेशची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. त्याच्यावर काही गुन्हे दाखल होते.