Govt Jobs : भारत सरकारच्या कंपनीत मोठी भरती, साठ हजारांहून अधिक पगार; कसा कराल अर्ज?

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स या भारत सरकारच्या कंपनीत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करणे बंधनकारक आहे.

ADVERTISEMENT

BHEL Recruitment
BHEL Recruitment
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये भरती

point

अर्जाची शेवटची तारीख काय?

BHEL Recruitment : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) द्वारे विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे आर्टिसन ग्रेड-IV पदाच्या एकूण 660 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीअंतर्गत फिटर, वेल्डर, टर्नर, मशिनिस्ट, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आणि फाऊंड्रीमन या विविध ट्रेड्ससाठी उमेदवारांची निवड केली जाईल. पात्र उमेदवारांना सुरुवातीला 1 वर्षाच्या कालावधीसाठी तात्पुरते आर्टिसन (Temporary Artisan) म्हणून नियुक्त केले जाईल आणि यादरम्यान दरमहा 24 हजार रुपये मानधन दिले जाईल. हा कालावधी यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमांनुसार उमेदवारांना 29,500 ते 65,000 रुपये या वेतनश्रेणीत नियमित केले जाईल.

शैक्षणिक पात्रता काय?

या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, संबंधित ट्रेडमध्ये 'नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट' (NTC/ITI) आणि 'नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट' (NAC) पूर्ण केलेले असावे. गुणवत्तेच्या अटींनुसार, NTC/ITI आणि NAC या दोन्ही परीक्षांमध्ये सामान्य व इतर मागासवर्गीय (General/OBC) उमेदवारांसाठी किमान 60% गुण, तर अनुसूचित जाती व जमाती (SC/ST) उमेदवारांसाठी किमान 55% गुण असणे अनिवार्य आहे. उमेदवारांचे कमाल वय 1 ऑक्टोबर 2026 रोजी 27 वर्षांपेक्षा जास्त नसावे, तसेच शासकीय नियमांनुसार राखीव वर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट लागू असेल.

हे ही वाचा : 'आंतरराष्ट्रीय डंका वाजवण्याची वेळ...' लंडनमधून ध्रुव राठीची हाक; कधी होणार आंदोलन?

'अशी' होणार परीक्षा

या भरतीची निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पडणार आहे. यामध्ये सर्वप्रथम कॉम्प्युटर आधारित परीक्षा (CBE) घेतली जाईल, त्यानंतर कागदपत्र पडताळणी (DV) आणि अहर्ताधारक कौशल्य चाचणी (Qualifying Skill Test) घेतली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना भारतातील बीएचईएलच्या 9 प्रमुख उत्पादन युनिट्समध्ये (Job Locations) नियुक्ती दिली जाईल.

हे ही वाचा : जालना: 'दोघेही पळून लग्न करू..', पीडितेनं त्रासाला कंटाळून संपवलं जीवन

अर्जाची अंतिम मुदत

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करणे बंधनकारक आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर असेल. या भरतीसाठीची अंदाजित परीक्षा 11 डिसेंबर रोजी आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. सविस्तर माहिती आणि ऑनलाईन अर्जासाठी उमेदवारांनी careers.bhel.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.