जालना: 'दोघेही पळून लग्न करू..', पीडितेनं त्रासाला कंटाळून संपवलं जीवन

Jalna crime news : जालना तालुक्यातील एका गावात इयत्ता अकरावीत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची घटना आहे. गावातच राहणाऱ्या एका तरुणाच्या सततच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने जीवन संपवल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला.

ADVERTISEMENT

Jalna crime news
Jalna crime news
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

अकरावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन

point

तरुणाचा सतत लग्नासाठी तगादा

Jalna Crime News : गौरव साळी - जालना तालुक्यातील एका गावात इयत्ता अकरावीत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची घटना आहे. गावातच राहणाऱ्या एका तरुणाच्या सततच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने जीवन संपवल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. लग्नासाठी सतत तगादा लावून ठेवणे, जवळीक साधण्याची संधी आणि पाठलाग करून त्रास देणे असे आरोप संबंधित तरुणावर करण्यात आले आहेत. 

हे ही वाचा : लातूरात लव्ह ट्रँगल, प्रेयसीचा स्क्रू ड्रायव्हरने चिरला गळा

'दोघेही पळून लग्न करूयात'

फिर्यादीनुसार, संबंधित तरुण हा काही दिवसांपासून विद्यार्थिनीच्या मागे होता. आपण एकाच समाजातील आहोत, दोघेही पळून लग्न करूयात, असं म्हणत तो मुलीशी जवळीकता साधू लागला होता. या प्रकाराबाबत विद्यार्थिनीने सुमारे एक ते दीड महिन्यापूर्वी आपल्या आई वडिलांना आणि काकांना माहिती दिली होती. यानंतर मुलीच्या आई वडिलांनी मुलाला समजावून सांगितले होते. तिला पुढील शिक्षण पूर्ण करायचे असून तिची सध्या लग्नाची इच्छा नाही. त्यामुळे तिला त्रास देणं थांबवावं आणि पाठलाग करू नये असे सांगितले. 

'माझ्याशी लग्न का करत नाही?'

मात्र, 9 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुण अचानक विद्यार्थिनीच्या घरात आला. त्याने पुन्हा एकदा माझ्याशी लग्न का करत नाही? असा प्रश्न केला. एवढंच नाहीतर विद्यार्थिनीच्या भावाला देखील जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादित म्हटले आहे, त्यानंतर तरुण तिथून निघून गेला होता. 

हे ही वाचा : Astrology : बुधादित्य योग आणि नवरात्रीच्या सप्तमीचा प्रभाव, 'या' राशींना मिळणार लाभ

या घटनेनंतर विद्यार्थिनीचा भाऊ घरातील व्यक्ती घरी आल्यानंतर या प्रकाराबाबत सांगण्याचे ठरवून बाहेर खेळण्यास गेला होता. मात्र, त्यादरम्यान विद्यार्थिनीने आत्महत्या केली. तरुणाने पीडितेला दिलेल्या सततच्या त्रासाने विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना आहे. प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांचे पथक घटनास्थळी आले. दरम्यान प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली.