मुंबईची खबर : मुंबई देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर, प्रदूषण रोखण्यासाठी BMC चा प्लॅन काय?

मुंबईकरांसाठी एक चिंतेची बाब समोर आली आहे. भारतातील सर्वाधिक प्रदूषिक शहरात मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे.

ADVERTISEMENT

Mumbai News
Mumbai News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

मुंबईकरांची चिंता वाढली

point

मुंबई देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर

Mumbai News : मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे. मुंबईतील वाढत्या उष्णतेमुळे आणि पावसानंतरच्या दमट वातावरणामुळे शहरात हवेच्या प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. 'आयक्यूएअर' (iQAir) या एअर क्वालिटी मॉनिटरिंग संस्थेच्या अहवालानुसार, मुंबई जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर पोहोचली असून, भारतातील शहरांमध्ये ती पहिल्या क्रमांकावर आहे. मान्सूनचा काळ अपूर्ण राहिल्यामुळे आणि पाऊस लवकर परतल्यामुळे हवेच्या गुणवत्तेवर हा विपरीत परिणाम झाला आहे.

प्रदूषण वाढण्याचं कारण काय?

या अहवालानुसार, गुरुवारी (15 ऑक्टोबर) मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 152 नोंदवला गेला, जो 'आयक्यूएअर'च्या मते आरोग्यासाठी हानिकारक श्रेणीत मोडतो. या प्रदूषणात 'ग्राउंड-लेव्हल ओझोन' (O3) हा मुख्य प्रदूषक घटक असल्याचे स्पष्ट झाले आहे. पावसाळा लवकर संपल्यानंतर मुंबईत कमाल तापमानात मोठी वाढ झाली असून, या महिन्याभरात अनेक दिवस तापमान सरासरीपेक्षा 4 ते 5 अंश सेल्सिअसने अधिक राहिले आहे.

हे ही वाचा : लातूरात लव्ह ट्रँगल, प्रेयसीचा स्क्रू ड्रायव्हरने चिरला गळा

बीएमसीने कसली कंबर

गेल्या दशकातील हवामानाचा विचार करता, या महिन्यात मुंबईने सलग तीन वेळा उच्चांकी उष्णतेची नोंद केली आहे. या वाढत्या तापमानामुळे आणि हवेतील प्रदूषणाशी मुकाबला करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने (BMC) कंबर कसली आहे. महानगरपालिकेने शहरातील 26 वॉर्डांमधील अधिकाऱ्यांना त्यांच्या भागातील प्रदूषणाचे मुख्य स्रोत (हॉटस्पॉट्स) शोधून त्यावर तात्काळ स्थानिक उपाययोजना करण्याचे कठोर निर्देश दिले आहेत.

हे ही वाचा : 'आंतरराष्ट्रीय डंका वाजवण्याची वेळ...' लंडनमधून ध्रुव राठीची हाक; कधी होणार आंदोलन?

भारतातील इतर प्रदूषित शहरे

सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत दिल्ली सहाव्या क्रमांकावर आहे. दिल्लीचा AQI 151 इतका नोंदवण्यात आला, तर कोलकाता दहाव्या क्रमांकावर असून 124 इतका AQI आहे.