मोठी बातमी! अभिजीत दीपके यांना जामीन मंजूर, पाहा काय आहेत न्यायालयाच्या अटी?
अभिजित दीपके यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आज (17 ऑक्टोबर) त्यांना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अभिजित दीपके यांना सशर्त जामीन मंजूर
काय आहेत न्यायालयाच्या अटी?
Abhijeet Dipke Bail : कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) प्रमुख अभिजित दीपके यांना दिल्लीच्या दंडाधिकारी न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, त्यांना 50 हजार रुपयांचा पीस बॉन्ड भरावा लागेल. ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांची लवकरच सुटका केली जाईल. त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले जाणार नसल्याचे या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे.
नेहा बोराची सुटका
राजधानी दिल्लीत आयोजित 'लहरा दो तिरंगा' या आंदोलनापूर्वी दिल्ली पोलिसांनी अभिजित दीपके यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यासह ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या (AISA) राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांनाही प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून अटक झाली होती, मात्र त्यांना आदल्या दिवशीच सोण्यात आले होते.
हे ही वाचा : 'आंतरराष्ट्रीय डंका वाजवण्याची वेळ...' लंडनमधून ध्रुव राठीची हाक; कधी होणार आंदोलन?
शांतता भंग करु नका
शनिवारी (17 ऑक्टोबर) कडेकोट सुरक्षेत अभिजित दीपके यांना मंदिर मार्ग पोलीस ठाण्यातील विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर (SEM) न्यायालयात हजर करण्यात आले. वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर त्यांना सशर्त जामीन मिळाला. पीस बॉन्डच्या अटींचे पालन करून कोणतीही शांतता भंग न करण्याची सूचना त्यांना देण्यात आली आहे.
हे ही वाचा : Govt Jobs : भारत सरकारच्या कंपनीत मोठी भरती, साठ हजारांहून अधिक पगार; कसा कराल अर्ज?
कलम 163 अंतर्गत कारवाई
शुक्रवारी (16 ऑक्टोबर) दिल्लीत लागू असलेल्या भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम 163 चे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली. कनॉट प्लेससह विविध भागांत जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल अनेक एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. पोलिसांनी वारंवार चेतावणी देऊनही गर्दी जमल्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले उचलण्यात येत आहेत.
