प्रधानांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री कोण?
Indian Education Minister : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री कोण असेल असा प्रश्न आता उपस्थित होत आहेत. केंद्र सरकारने केंद्रीय शिक्षण मंत्र्याबाबतची एकूण माहिती दिली आहे, ती पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आलीये.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा
केंद्रीय शिक्षण मंत्री कोण?
Indian Education Minister : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून प्रल्हाद याचं नाव समोर आलं आहे. प्रल्हाद जोशी यांना नवीन केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलंय. नीट-पेपरफुटी प्रकरणानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे. प्रधानांच्या राजीनाम्यानंतर विद्यार्थ्यांच्या पोटात आनंद मावेनासा झालेला आहे. सरकारने विद्यार्थ्यांच्या तीन मागण्या मान्य देखील केल्या आहेत.
हे ही वाचा : कॉक्रोज जनता पार्टीच्या सरकारकडून मागण्या मान्य, लिखित पत्र अन् आंदोलन मागे
कोण आहेत प्रल्हाद जोशी?
नवनिर्वाचित केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून प्रल्हाद जोशी यांना संधी देण्यात आली आहे. कर्नाटकच्या धारवाड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांच्याकडे नवीकरणीय ऊर्जा तसेच ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण या खात्याचा कारभार आहे. पाच वेळा खासदार राहिलेल्या जोशी यांनी पूर्वी देखील कोळसा, खाण आणि संसदीय कामकाज म्हणून मंत्रीपदाचे काम केले होते.
दरम्यान, राष्ट्रपती भवनाने एका प्रसिद्ध पत्रकात म्हटलं की, भारताच्या राष्ट्रपतींनी, पंतप्रधानंच्या सल्ल्यानुसार, भारतीय संविधान अनुच्छेद 75 च्या खंड (2) अंतर्गत प्रधान यांचा राजीनामा तात्काळपणे स्वीकारलेला आहे. तसेच पंतप्रधान यांच्या सल्ल्यानुसार, केंद्रीय शिक्षण खाते कॅबिनेट मंत्री प्रल्हाद जोशी यांना द्यावे. सध्याच्या खात्यांव्यतिरिक्त त्यांना शैक्षणिक खात्याची जबाबदारी सोपवण्यात आलीये.
हे ही वाचा : 12 वर्षातील सर्वात मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधानांचा अखेर राजीनामा, केंद्र सरकारला मोठा झटका
दरम्यान, महिनाभरापासून दिल्लीच्या जंतरमंतरवर मैदानावर कॉक्रोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांनी आंदोनल केलं. सुरूवातीला या आंदोलनाला अपेक्षित असा पाठिंबा मिळाला नव्हता, मात्र काही दिवसानंतर जनसमुदायातून आणि देशातील विद्यार्थ्यांकडून पाठिंबा मिळू लागला होता. नंतर सोनम वांगचुक यांनी गेली 26 दिवस उपोषण केले, त्याचदरम्यान सरकारने दडपशाही पद्धतीचा अवलंब केला, पोलिसांनी विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. 27 जुलै रोजी उपोषण मागे घेतलं आणि 25 जुलै रोजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला.
