'महाराष्ट्राच्या पोरानं दिल्ली हादरवून ठेवली...' दिपकेंची सावलीसारखी साथ देणारा मित्र
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर CJP आंदोलनाची देशभरात चर्चा सुरू आहे. या आंदोलनाचा प्रमुख चेहरा अभिजित दीपके यांच्याबद्दल त्यांचे जवळचे मित्र अनिश गावंडे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'महाराष्ट्राच्या पोरानं दिल्ली हादरवून ठेवली'
दिपकेंची सावलीसारखी साथ देणारा मित्र
Anish Gawande On Abhijit Dipke : दिल्लीच्या ऐतिहासिक जंतरमंतरवरील आंदोलनाला शेवटी मोठे यश मिळाले आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी मान्य झाल्यानंतर आंदोलकांच्या गोटात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रवक्ते आणि आंदोलक अभिजीत दीपके यांचे जवळचे मित्र अनिश गवांदे यांनी या विजयावर आनंद व्यक्त करत, महाराष्ट्राच्या एका तरुणाने आपल्या जिद्दीच्या बळावर थेट दिल्लीचे तक्त हादरवून सोडल्याची भावना व्यक्त केली.
तरीही माघार घेतली नाही
गेल्या 32 दिवसांपासून चाललेल्या या तीव्र उपोषण आणि आंदोलनादरम्यान अभिजीत दीपके यांना अनेक शारीरिक हालअपेष्टांना सामोरे जावे लागले. प्रकृती ढासळल्याने त्यांना टायफॉइडसारख्या आजाराचा सामना करावा लागला, तसेच आंदोलनादरम्यान त्यांच्या पायाला गंभीर दुखापतही झाली. असे असतानाही त्यांनी माघार घेतली नाही. या संपूर्ण कठीण काळात अभिजीत आपले मित्र अनिश गवांदे यांच्या घरी राहून विश्रांती व वैद्यकीय उपचार घेत आंदोलनाची धुरा सांभाळत होते.
हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्याला पाऊस झोडपणार, काही ठिकाणी यलो; तर कुठे रेड अलर्टचा अंदाज
तरुणांचा अतूट विश्वास
या आंदोलनात केवळ अभिजीतच नव्हे, तर महाराष्ट्रातील अनेक तरुणांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता भाग घेतला होता. लातूरवरून आलेल्या एका तरुणाचे उदाहरण देताना गवांदे यांनी सांगितले की, लाठीहल्ल्यात डोक्याला गंभीर दुखापत होऊनही आणि रक्ताने माखलेला असतानाही त्या तरुणाने 'राजीनामा आल्याशिवाय इथून हलणार नाही' असा ठाम निश्चय केला होता. तरुणांचा हाच अतूट विश्वास आणि पराकोटीचा संघर्ष या ऐतिहासिक यशाचा मुख्य आधार ठरला.
हे ही वाचा : 'मुकेश अंबानींच्या जन्मादिवशी दहा हजार लोक जन्मले...' अंकशास्त्रज्ञांनी काय सांगितलं?
महाराष्ट्राच्या तरुणाने दिल्लीत रचला इतिहास
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी मान्य झाल्यानंतर ही केवळ एका आंदोलनाची समाप्ती नसून, अन्यायाविरुद्ध उठलेल्या युवा शक्तीच्या संघर्षाची ही फक्त सुरुवात असल्याचे अनिश गवांदे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या तरुण रक्ताने दिल्लीत रचलेला हा इतिहास आणि अभिजीत दीपके यांनी सुरू केलेली ही मोहीम यापुढेही अन्यायाविरोधात अशीच धगधगत राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
