मुंबईची खबर: मुंबईत हक्काचं घर घेण्याची संधी! तब्बल 120 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; 5 फेब्रुवारीपासून नोंदणी सुरु...

मुंबई तक

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने (MHADA) 2 फेब्रुवारी रोजी मुंबईत प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर 120 फ्लॅट्सची विक्री करण्याची घोषणा केल्याचं वृत्त समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

मुंबईत 120 घरांसाठी म्हाडाची लॉटरी!
मुंबईत 120 घरांसाठी म्हाडाची लॉटरी!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईत हक्काचं घर घेण्याची संधी!

point

तब्बल 120 घरांसाठी म्हाडाची लॉटरी

MHADA Lottery: महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने (MHADA) 2 फेब्रुवारी रोजी मुंबईत 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या तत्त्वावर 120 फ्लॅट्सची विक्री करण्याची घोषणा केल्याचं वृत्त समोर आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विक्रीसाठी असलेला सर्वात महागडी घरे दक्षिण मुंबईतील ताडदेव येथे आहे, ज्यांची किंमत 8 कोटींपेक्षा जास्त आहे, तर घराची कमीत कमी किंमत 31 लाख असणार आहे. 

म्हाडाच्या माहितीनुसार, कांदिवली, चारकोप, शिंपोली, अँटॉप हिल, वडाळा, पवई, मालाड, मानखुर्द, घाटकोपर, विक्रोळी, भायखळा, ताडदेव, लोअर परळ, सायन, जुहू आणि अंधेरी या भागात फ्लॅट उपलब्ध आहेत. तसेच, FCFS योजनेअंतर्गत समाविष्ट असलेले फ्लॅट्स पूर्वी लॉटरीद्वारे देण्यात आले होते परंतु काही कारणांमुळे ते विकले गेले नाहीत आणि आता तेच फ्लॅट्स विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. 

कधीपासून कराल अर्ज? 

म्हाडाच्या या लॉटरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 5 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार असून यासाठी इच्छुक नागरिक https://bookmyhome.mhada.gov.in या अधिकृत वेबसाइटवर त्यांचे अर्ज करू शकतात आणि या संधीचा लाभ घेऊ शकतात. अर्ज करण्यासाठी म्हाडाच्या वेबसाइटवर प्रथम नोंदणी करणं आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज सादर करणे, अनामत रक्कम भरणे, अर्ज शुल्क भरणा, योजना /घर निश्चिती करणं या प्रक्रियेला 12 फेब्रुवारीच्या सकाळी 11 पासून सुरुवात होणार आहे. म्हाडाच्या मते, अर्जाच्या तारखेला, अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असणं आवश्यक आहे आणि तो भारतीय नागरिक असणं अनिवार्य आहे. 

अविवाहितांसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्डचा समावेश आहे, तर विवाहित अर्जदारांसाठी पती-पत्नी दोघांचेही आधार आणि पॅन कार्ड यांचा समावेश आहे. तसेच, घटस्फोटित अर्जदारांना न्यायालयाच्या निकालाची प्रमाणित प्रत किंवा दाखल केलेल्या अपीलाची प्रत सादर करावी लागेल (अंतिम निकालाच्या प्रतीशिवाय फ्लॅटचा ताबा दिला जाणार नाही). डिक्री (decree) प्रमाणपत्राशिवाय फ्लॅटची विक्री केली जाणार नसल्याचं म्हाडाच्या निवेदनात म्हटलं आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp