आई-वडील महाराष्ट्रातून मजुरीसाठी तेलंगणात गेले, अन् इकडं घरात कोणी नसताना 10 वर्षांच्या मुलाने..., सर्वत्र हळहळ

मुंबई तक

Gadchiroli Suicide : गडचिरोली जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. एका लहान मुलाने ओढणीने गळफास घेत जीवनयात्रा संपवली. ही घटना आरमोरी तालुक्यातील कोजबी गावात घडली. संस्कार विनोद कन्नोके (वय 10) असे त्या लहान मुलाचे नाव आहे.

ADVERTISEMENT

Gadchiroli Suicide case
Gadchiroli Suicide case
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गडचिरोली जिल्ह्यात मन हेलावणारी घटना

point

संस्कारने ओढणीने गळफास घेत संपवलं जीवन

Gadchiroli Suicide : गडचिरोली जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. एका लहान मुलाने ओढणीने गळफास घेत जीवनयात्रा संपवली. ही घटना आरमोरी तालुक्यातील कोजबी गावात घडली. संस्कार विनोद कन्नोके (वय 10) असे त्या लहान मुलाचे नाव आहे. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचं चित्र आहे. 

हे ही वाचा : "माझ्याकडे भाजपची 'ती' फाईल असल्याचं अजितदादांनी सांगितलं, अन् 10 दिवसांत त्यांचा मृत्यू", बड्या नेत्याचा दावा

संस्कारने ओढणीने गळफास घेत संपवलं जीवन

आत्महत्या केलेल्या लहान मुलाचे आई-वडील हे तेलंगणात मजुरीच्या कामासाठी गेले होते. तोवर संस्कारने ओढणीने गळफास घेत आपलं जीवन संपवलं. संस्कारने घेतलेल्या टोकाच्या भूमिकेनं परिसर हादरून गेला आहे. स्कार गावात आपल्या आजी-आजोबा आणि मोठ्या बहिणीसोबत राहत होता. 

संस्कार हा स्थानिक जिल्हा परिषद शाळेत चौथीच्या वर्गात शिक्षण घेत होता. रविवारी 1 फेब्रुवारी दुपारी तो बाहेरून खेळून घरी परतला होता. सायंकाळी 4:30 च्या सुमारास, आजी-आजोबा घरातच असताना गळफास घेत जीवन संपवलं. 

हे ही वाचा : बीड : पतीने मोबाईल घेऊन दिला नाही; साडेतीन वर्षांच्या मुलासह आईची विहिरीत उडी, दोघांचाही करुण अंत

काही वेळानंतर कुटुंबीयांना हा प्रकार लक्षात आला. या घटनेनं त्यांच्या पायाखालची देखील जमीन सरकली. या घटनेनं परिसरात एकच गोंधळ उडाल्याचं चित्र आहे. या एकूण घटनेची माहिती मिळताच कोजबीच्या पोलीस पाटील माधुरी सहारे यांनी आरमोरी पोलिसांना पाचारण करण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp