बीड : मोबाईल अन् दारुसाठी पैशांचा वाद, नातवाने आजोबाला संपवलं; अन् नैसर्गिक मृत्यूचा बनाव रचला
Beed Crime News : मिलिंद नगर येथे वास्तव्यास असलेले रामभाऊ गायकवाड यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूची नोंद प्रथम आकस्मित म्हणून करण्यात आली होती. मात्र मृत्यूच्या परिस्थितीबाबत काही संशयास्पद बाबी आढळून आल्याने संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी सुरू केली. तपासादरम्यान मृत्यू नैसर्गिक नसून मारहाणीमुळे झाल्याचे निष्पन्न झाले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बीड : मोबाईल अन् दारुसाठी पैशांचा वाद
नातवाने आजोबाला संपवलं; अन् नैसर्गिक मृत्यूचा बनाव रचला
बीड / रोहिदास हातागळे : परळी शहरातील मिलिंद नगर परिसरात दारू व मोबाईलसाठी पैशांची मागणी नाकारल्याच्या रागातून नातवानेच आपल्या आजोबांचा मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला आकस्मित मृत्यू म्हणून नोंद झालेल्या या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिस चौकशीतून खरा प्रकार समोर आला असून, यानंतर आरोपी नातवाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिलिंद नगर येथे वास्तव्यास असलेले रामभाऊ गायकवाड यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूची नोंद प्रथम आकस्मित म्हणून करण्यात आली होती. मात्र मृत्यूच्या परिस्थितीबाबत काही संशयास्पद बाबी आढळून आल्याने संभाजीनगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी सुरू केली. तपासादरम्यान मृत्यू नैसर्गिक नसून मारहाणीमुळे झाल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणात मृत रामभाऊ गायकवाड यांच्या पत्नी द्रौपदीबाई गायकवाड यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीनुसार नातू शुभम बाळू गायकवाड (वय 27, रा. मिलिंद नगर, परळी) हा दारू पिण्यासाठी आणि मोबाईलसाठी वारंवार पैशांची मागणी करत होता. संबंधित दिवशीही त्याने पैशांची मागणी केली होती. मात्र पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने आजोबांशी वाद घातला.










