बायको आणि Ex Boyfriend सापडले हॉटेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत, Love Marriage केलेल्या पतीला बसला मोठा धक्का!

मुंबई तक

Wife With Ex Boyfriend: अलीगढमध्ये एका पतीने पत्नीला तिच्या प्रियकरासोबत हॉटेलच्या खोलीत रंगेहाथ पकडले. त्यानंतर पुढे बराच गोंधळ पाहायला मिळाला. जाणून घ्या नेमकं काय घडलं.

ADVERTISEMENT

wife and ex boyfriend caught in a compromising situation in hotel room husband who love marriage left deeply shocked
नवऱ्याने पत्नीला बॉयफ्रेंडसोबत पकडलं आक्षेपार्ह अवस्थेत
social share
google news

अलीगढ: अलीगढच्या गुलावठी येथे राहणाऱ्या एका तरूणाने सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी एका तरुणीशी प्रेमविवाह केला होता. त्यावेळी त्यांनी समाजाच्या नियमांना न जुमानता आयुष्यभर एकत्र राहण्याची आणि एकत्र मरण्याची शपथ घेतली होती. तरुणाला विश्वास होता की, त्यांच्या प्रेमविवाहामुळे त्यांचे जग आनंदाने भरून जाईल. पण त्याला हे माहीत नव्हते की ज्या प्रेमावर त्याने विश्वास ठेवला होता, तेच प्रेम एके दिवशी त्याचा सर्वात मोठा विश्वासघात करेल.

नेमकं प्रकरण काय?

विवाहित असूनही, पत्नी तिच्या पूर्वीचा प्रियकर याला आपल्या आयुष्यातून काढू शकली नाही. पतीसोबत राहत असतानाही, ती त्याच्या सतत संपर्कात होती. ते फोनवर बराच वेळ बोलायचे. जेव्हा पतीला हे कळले, तेव्हा त्याने आपले घर वाचवण्यासाठी आपल्या पत्नीला वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा तिच्यावर काहीही परिणाम झाला नाही.

हे ही वाचा>> तेजल, पायल अन् अंजली... हॉटेलमध्ये विना कपड्यांची समोर आली अन् शिक्षकाचा विषयच The End

पत्नीच्या या बाहेरख्यालीपणामुळे आणि प्रियकरासोबतच्या वाढत्या जवळीकीमुळे कुटुंबात तणाव वाढू लागला. प्रकरण इतके वाढले की दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. स्वतःचे संरक्षण करण्यासाठी पत्नीने तिच्या पतीविरुद्ध थेट हुंड्यासाठी छळ आणि पोटगीचा खटला दाखल केला. नोव्हेंबर 2025 मध्ये, ती पतीचे घर सोडून माहेरी गेली, पण तिथेही ती तिच्या प्रियकराला भेटत राहिली.

यावेळी पतीची खात्री पटली होती की, त्याची पत्नी त्याला फसवते आहे, म्हणून त्याने तिच्यावर नजर ठेवण्यास सुरुवात केली. तो तिच्या प्रत्येक हालचालीवर आणि संवादांवर गुप्तपणे लक्ष ठेवत होता. दरम्यान, त्याला बातमी मिळाली की त्याची पत्नी अलीगढच्या क्वारसी पोलीस स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये तिच्या पूर्वीच्या प्रियकरासोबत राहत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp