शाळेची चौकशी भोवली.. अभिजीत दीपकेंवर FIR, काय घडलं लातूरमध्ये?
Latur police fir abhijeet dipke cjp school trespassing case : लातूर जिल्ह्यातील सरकारी शाळेत विनापरवानगी प्रवेश केल्याचा आरोप CJP संस्थापक अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणणे आणि शिक्षकांना धमकावल्याच्या आरोपांवरून औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शाळेची चौकशी भोवली..
अभिजीत दीपकेंवर FIR, काय घडलं लातूरमध्ये?
Latur police fir abhijeet dipke cjp school trespassing case : लातूर जिल्ह्यात कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी शाळेत विनापरवानगी प्रवेश करणे, सरकारी कामात अडथळा आणणे आणि शिक्षकांना धमकावल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी जिल्हा परिषद उर्दू शाळेतील 53 वर्षीय शिक्षिका सैयद शमशादबानो खैरात अली यांच्या तक्रारीवरून औसा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दिपके हे CJPच्या सुरू असलेल्या ‘स्कूल ठीक करो’ अभियानाअंतर्गत मध्य महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील शाळांना भेटी देत असून, तेथील समस्या समोर आणत आहेत.
हेही वाचा : आधी महिलेवर बलात्कार नंतर श्वासनलिका कापून केली हत्या, 'त्या' दोन महिलांसोबत काय घडलं?
लातूर जिल्ह्यातील औसाजवळील जावळी येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत दिपकेंनी भेट दिल्यानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोणतीही परवानगी न घेता शाळेत प्रवेश केल्याचा आरोप आहे. त्यानंतर ते विद्यार्थ्यांमध्ये जाऊन बसले आणि त्यांना अनेक प्रश्न विचारले. या प्रकारामुळे शाळेतील शिक्षण आणि सरकारी कामात अडथळा निर्माण झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा : महाराष्ट्र हळहळला, नवजात बालकांच्या ICU मध्ये व्हेंटिलेटरचा स्फोट, 3 बाळांचा मृत्यू
