प्रेम प्रकरण, चार एकर जमीन आणि 22 वर्षीय श्रेयाची हत्या; नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

वाराणसीतील 22 वर्षीय एमएस्सी विद्यार्थिनी श्रेयाच्या खळबळजनक हत्येप्रकरणी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिचाच एक नातेवाईक तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता. नेमकी घटना काय आहे, जाणून घ्या.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

प्रेम प्रकरण, चार एकर जमीन आणि 22 वर्षीय श्रेयाची हत्या

point

नेमकं प्रकरण काय?

Crime News : वाराणसीतील एका 22 वर्षीय एम.एससी.च्या विद्यार्थिनीची गळा चिरून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. श्रेया उर्फ मोनू असे या दुर्दैवी तरुणीचे नाव असून, 20 ऑगस्ट रोजी एका भाड्याच्या खोलीच्या बाथरूममध्ये तिचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. श्रेया 18 ऑगस्टपासून अचानक बेपत्ता झाली होती आणि तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रारही नोंदवली होती. या प्रकरणाचा तपास केला असता, तिच्या एका दूरच्या नातेवाइकानेच मालमत्तेच्या हाव्यासपोटी आणि लग्नास नकार दिल्याच्या रागातून तिचे अपहरण करून हे भयानक कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे.

श्रेयावर लग्नासाठी दबाव

या हत्येमागील मुख्य कारणांचा शोध घेतला असता कुटुंबीयांनी अत्यंत धक्कादायक माहिती दिली आहे. श्रेया ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती आणि तिच्या नावावर भविष्यात जवळपास साडेचार एकर मोक्याची जमीन येणार होती. आरोपी विवेक चौबेची नजर याच मौल्यवान जमिनीवर होती. श्रेयाशी लग्न झाल्यास ही सर्व मालमत्ता आपल्यालाच मिळेल, असा त्याचा डाव होता. यामुळेच तो श्रेयावर लग्नासाठी सातत्याने दबाव टाकत होता आणि तिने याला विरोध दर्शवल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकीही देत होता.

हे ही वाचा : मुंबईच्या दोन डॉक्टरांचा पाकिस्तानला पुळका, 'गुपित' कनेक्शनची भन्नाट कहाणी!

भाड्याच्या खोलीत चिरला गळा

दरम्यान, श्रेयाचा विवाह मिर्झापूर येथील एका तरुणाशी निश्चित झाला होता. येत्या 22 नोव्हेंबरला त्यांचा साखरपुडा आणि पुढील वर्षी 26 फेब्रुवारीला विवाहसोहळा पार पडणार होता. आपला डाव पूर्ण होणार नाही हे लक्षात आल्यानंतर आरोपी विवेक चौबे अत्यंत चिडला होता. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 ऑगस्ट रोजी श्रेया कॉलेजला जात असताना आरोपीने वाटेतच तिचे अपहरण केले आणि तिला एका भाड्याच्या खोलीत नेऊन तिची गळा चिरून हत्या केली.

हे ही वाचा : आयफोनसाठी 13 वर्षीय नात झाली क्रूर, प्रियकरासोबत मिळून आजोबांना संपवलं

कशी सापडली श्रेया?

हत्या केल्यानंतर आरोपी विवेक खोलीला बाहेरून कुलूप लावून मिर्झापूर येथील भुवालपूर येथे आपल्या आत्याच्या घरी पळून गेला. तेथे आपली दुचाकी, बॅग आणि खोलीची चावी सोडून तो फरार झाला. पोलिसांनी या चावीच्या मदतीने खोलीचे कुलूप उघडले असता बाथरूममध्ये दोन दिवसांपासून पडलेला मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके तैनात करण्यात आली आहेत. सध्या घरमालक विवेक द्विवेदी आणि आरोपीच्या वडिलांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे.