प्रेयसीने ट्रक ड्रायव्हरला केबिनमध्येच जाळलं, हादरवून टाकणारी घटना
एका ट्रकच्या केबिनमध्ये ड्रायव्हरचा जळून मृत्यू झाला होता. उत्तर प्रदेशातील या प्रकरणी एक खळबळजनक खुलासा झाला आहे. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या ही घटना म्हणजे एक हत्याकांड आहे. ड्रायव्हरच्या प्रेयसीनेच ही हत्या केल्याचे समोर आले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
प्रेयसीने ट्रक ड्रायव्हरला केबिनमध्येच जाळलं
हादरवून टाकणारी घटना
Crime News : एका ट्रकला 10 जुलैच्या रात्री आग लागून चालक आणि मालक बलविंदर सिंह यांचा जळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. सुरुवातीला हा अपघात असल्याचे वाटत असले, तरी पोलिसांच्या सखोल तपासात हा कोणताही अपघात नसून एका प्रेयसीने रचलेला हत्येचा भीषण कट असल्याचे उघडकीस आले आहे. 40 वर्षीय अमनदीप कौर उर्फ अमन हिने तिच्याशी सुरू असलेले प्रेमसंबंध संपवण्यासाठी ही भयंकर घटना घडवून आणल्याचे उघड झाले आहे. उत्तर प्रदेशातील पीलीभीत येथे ही घटना घडली होती.
केबिनमध्ये सापडला जळालेला मृतदेह
10 जुलै 2026 रोजी पूरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मोठ्या कालव्याजवळ, गुरुद्वारा धन्ना बाबा महामार्गावर एका उभ्या असलेल्या ट्रकला भीषण आग लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस आणि अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली, मात्र ट्रकच्या केबिनमध्ये एक पूर्णपणे जळालेला मृतदेह आढळून आला. या मृतदेहाची ओळख रामपूर येथील रहिवासी बलविंदर सिंह म्हणून पटली. याप्रकरणी मृत व्यक्तीचा भाऊ गुरमीत सिंह याच्या तक्रारीवरून पूरपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे ही वाचा : शिवसेना सुनावणी LIVE: ठाकरेंनी पुन्हा नार्वेकरांना घेरलं, सिब्बलांचा घणाघाती युक्तिवाद सुरू
'ब्रेकअप करायचा होता...'
पोलीस अधीक्षक सुकीर्ती माधव यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संशयित महिला अमनदीप कौर हिला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच तिने आपला गुन्हा कबूल केला. चौकशीदरम्यान तिने सांगितले की, गेल्या 2 ते 3 वर्षांपासून बलविंदरसोबत तिचे प्रेमसंबंध होते. तिला हे नाते संपवायचे होते, परंतु बलविंदर मात्र या नात्यावर ठाम होता. 10 जुलै रोजी दोघांमध्ये भेट झाली असता यावरून जोरदार वाद झाला आणि याच वादातून तिने बलविंदरचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.
हे ही वाचा : नागपूर : हॉटेलची रुम सजवली, बेडवर गुलाबाच्या पाकळ्या..,लव्ह रक्तरंजित एन्ड
'अशी केली हत्या'
वाद विकोपाला गेल्यानंतर अमनदीपने ट्रकमध्ये ठेवलेल्या लोखंडी रॉडने बलविंदरच्या डोक्यावर जोरदार वार करून त्याला बेशुद्ध केले. यानंतर हा प्रकार अपघाती आगीचा वाटवा आणि पुरावे नष्ट व्हावेत यासाठी तिने केबिनमध्ये ठेवलेले डिझेल त्याच्यावर ओतून आग लावून दिली आणि तेथून पळ काढला. आगीत गंभीर भाजल्यामुळे बलविंदरचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्यात वापरलेला लोखंडी रॉड आणि डिझेलचा कॅन जप्त केला असून आरोपी महिलेला न्यायालयासमोर हजर करून तुरुंगात पाठवले आहे.
