नागपूर : एकीवर दोघांचा जडला जीव, आरोपीच्या जामिनानंतर रक्तरंजित थरार

मुंबई तक

Nagpur Crime : नागपूर येथून मन सुन्न करून टाकणारा प्रकार नुकताच उघडकीस आलाय. जामीनावर बाहेर आलेल्या एका गँगस्टरने चाकूने हल्ला करत संपवलं. पोलिसांनी सांगितलं की, 2 आठवड्यापूर्वी जामीनावर सुटून आलेला 27 वर्षीय गुन्हेगाराच्या साथीदाराने चाकूने हल्ला करत हत्या केली.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

नागपूर येथून मन सुन्न करून टाकणारा प्रकार

point

एकाच महिलेवर दोघांचा जडला जीव

point

तिच्यामुळे घटना रक्तरंजित थरार

Nagpur Crime : नागपूर येथून मन सुन्न करून टाकणारा प्रकार नुकताच उघडकीस आलाय. जामीनावर बाहेर आलेल्या एका गँगस्टरने चाकूने हल्ला करत संपवलं. पोलिसांनी सांगितलं की, 2 आठवड्यापूर्वी जामीनावर सुटून आलेला 27 वर्षीय गुन्हेगाराच्या साथीदाराने चाकूने हल्ला करत हत्या केली. एका महिलेवरून झालेल्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती आहे. संबंधित महिलेवर गुंडाच्या साथीदाराचे प्रेम होते. ही घटना नागपूर येथील नरेंद्रनगर शहरातील सुंदरबन येथील आहे.  

हे ही वाचा : बायकोच्या माहेरच्या मंडळींनी सॉफ्टवेअर इंजीनिअर जावयाला संपवलं अन्..

आरोपीवर मर्डर आणि मर्डरचा प्रयत्न प्रकरणातील अंदाजे नऊ गुन्हे 

पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, पंकज रागडेची कथितरित्या गौरव रामभाऊ राउत आणि साथीदार अभिषेक वासनिकने चाकूने हल्ला करत हत्या केली. गौरव रागडे ही व्यक्ती नागपूर येथील गमचू मर्डर प्रकरणातील आरोपी आहे. त्याच्यावर अनेक आरोप लावण्यात आले आहेत. पोलिसांच्या रेकॉर्डमधून समजले की, त्याच्या विरोधात मर्डर आणि मर्डरचा प्रयत्न प्रकरणातील अंदाजे नऊ गुन्हे दाखल आहेत. 

जेव्हा गौरव रागडे तुरूंगात तेव्हा रानीची गौरव राऊतसोबत ओळख

पोलिसांच्या सूत्रांनी वृत्तमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, गौरव रागडे हा एका रानी नावाच्या मुलीच्या प्रेमात होता. रानी ही मुंबईतील राहणारी होती. जेव्हा  गौरव रागडे तुरूंगात होता, तेव्हा रानीची गौरव राऊतसोबत चांगली ओळख झाली होती. दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली, गौरव राउत हा यवतमाळ येथील रहिवासी होता.

रानीला गुन्हेगारी क्षेत्रापासून दूर राहायचे होते, म्हणून त्यांनी राउतसोबत नरेंद्रनगर परिसरात क्लाउड किचनचा बिझनेस सुरू केला, दोघेही भाडेतत्त्वाच्या घरातच राहत होते. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर गौरव रागडेला जेव्हा या घटनेची माहिती मिळाली असता, खूप राग आला. गुरूवारी दुपारी 20 ऑगस्ट रोजी रानी, गौरव राऊतच्या घरी गेली, तिथे पार्टी सुरू होती. गौरव रागडे याला या घटनेची माहिती मिळताच, तो गौरव राऊतच्या घरी गेला. नंतर त्याने तोडफोड केली, शिवीगाळ केली.