रिटायर्ड शिक्षिकेची निर्घृण हत्या, दरोडा टाकताना पाहिल्याने घेतला जीव
एका निवृत्त शिक्षिकेची त्यांच्या दिल्ली येथील घरी दरोड्यादरम्यान हत्या करण्यात आली. पोलिसांनी चौकशीसाठी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. रात्री घरात आलेल्या दरोडेखोरांना त्यांनी ओळखल्यानेच त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
रिटायर्ड शिक्षिकेची निर्घृण हत्या
दरोडा टाकताना पाहिल्याने घेतला जीव
Crime News : दिल्लीतील पंतनगर या उच्चभ्रू भागात शुक्रवारी पहाटे एक भयानक घटना घडली. एका 70 वर्षीय रिटायर्ड शिक्षिकेची राहत्या घरी दरोडा टाकून निर्घृण हत्या करण्यात आली. प्रीती कुमार असं त्यांचं नाव आहे. त्या घरात एकट्याच राहत होत्या. एका खाजगी शाळेतून निवृत्त झाल्यानंतर एका स्वयंसेवी संस्थेत (NGO) सामाजिक कार्य करत होत्या, जिथे त्या दवाखान्यातील रुग्ण नोंदणीचे काम पाहायच्या. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून स्थानिक रहिवाश्यांमध्ये चिंतेचे सावट आहे.
दरोडेखोरांना ओळखले अन् सगळं संपलं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हेगारांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हा गुन्हा केला. चोरी करण्यासाठी प्रीती कुमार यांच्या घरात शिरण्यापूर्वी दरोडेखोरांनी शेजाऱ्यांच्या घरांचे कडी-कोयंडे बाहेरून लावून घेतले, जेणेकरून कोणीही मदतीला बाहेर येऊ नये. त्यानंतर त्यांनी घरात प्रवेश करून मौल्यवान वस्तूंची चोरी करण्यास सुरुवात केली. दरम्यान, प्रीती कुमार यांना जाग आली आणि त्यांनी दरोडेखोरांना ओळखल्याची शंका आल्यामुळे, आरोपींनी त्यांचे हात बांधून त्यांची हत्या केली व मुद्देमालासह पळ काढला.
हे ही वाचा : बायकोच्या माहेरच्या मंडळींनी सॉफ्टवेअर इंजीनिअर जावयाला संपवलं अन्..
संशयितांची चौकशी सुरु
या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांची अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत. शुक्रवारी पहाटे घडलेल्या या घटनेनंतर रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत तरी या प्रकरणात कोणतीही अधिकृत अटक झाली नव्हती. पोलिस सध्या परिसरातील सर्व सीटीटीव्ही (CCTV) फुटेजची तपासणी करत असून संशयितांची चौकशी करत आहेत. तसेच चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करण्यासाठी विविध ठिकाणी छापे मारले जात आहेत.
हे ही वाचा : कावड यात्रेत DJ वाहनांची धडक; एकाचा मृत्यू; Video व्हायरल
15 दिवसांपूर्वी केले होते फर्निचरचे काम
तपासादरम्यान पोलिस या दिशेनेही विचार करत आहेत की, आरोपी हे प्रीती कुमार किंवा त्यांच्या घराशी आधीपासूनच परिचित असावेत. घटनेच्या 15 दिवसांपूर्वीच त्यांच्या घरातील खिडक्या, दरवाजे आणि फर्निचरच्या दुरुस्तीचे काम झाले होते, त्यामुळे या कामात गुंतलेल्या कामगारांचीही कसून चौकशी केली जात आहे. शिवाय, त्यांच्या दरवाजाची कडी सैल असल्याचा फायदा गुन्हेगारांनी घेतला असावा असा संशय असून 48 तासांनंतरही पोलिसांना ठोस यश मिळालेले नाही.
