Govt Jobs : इंडियन ऑईलमध्ये 433 जागांची भरती, अर्ज कसा कराल?

मुंबई तक

इंडियन ऑईलमध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु झाली आहे. याअंतर्गत 433 जागांची भरती करण्यात येणार आहे. डिप्लोमा, आयटीआय आणि पदवीधरांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

ADVERTISEMENT

IOCL Recruitment
IOCL Recruitment
Google CTA

बातम्या हायलाइट

point

इंडियन ऑईलमध्ये 433 जागांची भरती

point

जाणून घ्या पात्रतेचे निकष

IOCL Recruitment : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), मार्केटिंग डिव्हिजन अंतर्गत शिकाऊ उमेदवारांसाठी (Apprentice) मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण 433 जागा भरल्या जाणार असून उत्तर भारतातील 9 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. 12 महिन्यांच्या कालावधीसाठी ही निवड केली जाणार आहे.

गुणांच्या आधारे होणार निवड

या भरतीअंतर्गत विविध 4 पदांसाठी जागा उपलब्ध आहेत. यामध्ये ट्रेड अप्रेंटिसच्या 104 जागा, डेटा एन्ट्री ऑपरेटरच्या 69 जागा, टेक्निशियन अप्रेंटिसच्या 156 जागा आणि पदवीधर अप्रेंटिसच्या 4 जागांचा समावेश आहे. अशा प्रकारे एकूण 433 जागांसाठी ही प्रक्रिया राबवली जात आहे. पात्र उमेदवारांची निवड कोणत्याही लेखी परीक्षेविना किंवा मुलाखतीशिवाय, केवळ शैक्षणिक पात्रतेमधील गुणांच्या गुणवत्तेवर (Merit List) केली जाणार आहे.

हे ही वाचा : बायकोच्या माहेरच्या मंडळींनी सॉफ्टवेअर इंजीनिअर जावयाला संपवलं अन्..

ITI, बारावी आणि पदवीधरांना संधी

शैक्षणिक पात्रतेबाबत बोलायचे झाल्यास, ट्रेड अप्रेंटिससाठी संबंधित ट्रेडमध्ये ITI (फिटर, इलेक्ट्रिशियन, सिव्हिल इत्यादी), डेटा एन्ट्री ऑपरेटरसाठी 12 वी उत्तीर्ण, टेक्निशियन अप्रेंटिससाठी इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि पदवीधर अप्रेंटिससाठी BA, B.Com, B.Sc किंवा BBA ही पदवी आवश्यक आहे. खुल्या, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना किमान 50% गुण, तर अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांग उमेदवारांना किमान 45% गुण असणे अनिवार्य आहे. वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता गणण्यासाठी 31 ऑगस्ट 2026 ही कट-ऑफ तारीख निश्चित करण्यात आली आहे.

हे ही वाचा : कावड यात्रेत DJ वाहनांची धडक; एकाचा मृत्यू; Video व्हायरल

अर्जाची अंतिम तारीख

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 7 ऑगस्ट पासून सुरू झाली असून ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 सप्टेंबर आहे. इच्छुकांनी NAPS/NATS पोर्टल तसेच मायक्रोसॉफ्ट ऑफिस फॉर्मद्वारे आपले अर्ज सादर करायचे आहेत. अधिक माहिती व सविस्तर जाहिरातीसाठी उमेदवारांनी आयओसीएलच्या अधिकृत संकेतस्थळाला (www.iocl.com/apprenticeships) भेट द्यावी.