Maharashtra Weather : राज्यात पावसाचा यु टर्न, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Weather : काही दिवसांपासून राज्यात संथ पाऊस पडताना दिसतोय, तर काही भागांत नुसते ढगाळ वातावरण दिसून येत असून पावसाची शक्यता अगदीच कमी असल्याचे जाणवते. अशातच जाणून घ्या एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे..
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज
जाणून घ्या एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे..
Maharashtra Weather : राज्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर कुठे हलक्या पावसाची स्थिती वर्तविण्यात येते. काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. काही दिवसांपासून राज्यात संथ पाऊस पडताना दिसतोय, तर काही भागांत नुसते ढगाळ वातावरण दिसून येत असून पावसाची शक्यता अगदीच कमी असल्याचे जाणवते. अशातच जाणून घ्या एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे..
हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगरात खवड्या टेकडी प्रकरणाला वळण, 2025 मध्ये मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न
कोकण
कोकण विभागातील पालघरमध्ये हलक्या स्वरुपाचा अंदाज आहे. तर ठाणे, मुंबई आणि रायगडमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाची पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अधिकचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यांत हलक्या स्वरुपाचा अंदाज आहे. धुळे, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. नाशिक घाटमाथा परिसरात मध्यम स्वरुपाच्या पावसाची दाट शक्यता आहे. अहिल्यानगरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि सातारा या ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे.
