महाराष्ट्र हळहळला, नवजात बालकांच्या ICU मध्ये व्हेंटिलेटरचा स्फोट, 3 बाळांचा मृत्यू

मुंबई तक

Amravati district women hospital nicu fire : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता कक्षाला पहाटे आग लागली. या दुर्घटनेत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक बालकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.

ADVERTISEMENT

Amravati district women hospital nicu fire
Amravati district women hospital nicu fire
Google CTA

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्र हळहळला, नवजात बालकांच्या ICU मध्ये व्हेंटिलेटरचा स्फोट,

point

3 बाळांचा मृत्यू

Amravati district women hospital nicu fire, धनंजय साबळे  : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील तिसऱ्या माळ्यावर असलेल्या नवजात शिशु अतिदक्षता कक्षाला सोमवारी (दि.24) पहाटे अचानक आग लागली. या दुर्घटनेत तीन लहान बाळांचा मृत्यू झालाय. पहाटे साडेतीनच्या सुमारास व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आग लागल्यानंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली. नवजात शिशु कक्षात त्यावेळी 39 लहान बाळांना ठेवण्यात आले होते.

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगरात खवड्या टेकडी प्रकरणाला वळण, 2025 मध्ये मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

कर्मचाऱ्यांकडून तातडीने बचावकार्य सुरू

आग लागल्याचे लक्षात येताच ड्युटीवर असलेल्या डॉक्टर, नर्स आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. आग आणि धूर पसरत असताना कर्मचाऱ्यांनी नवजात बालकांना कक्षातून बाहेर काढण्यास सुरुवात केली. अनेक बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात कर्मचाऱ्यांना यश आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

हेही वाचा : नागपूर : एकीवर दोघांचा जडला जीव, आरोपीच्या जामिनानंतर रक्तरंजित थरार