तेजल, पायल अन् अंजली... हॉटेलमध्ये विना कपड्यांची समोर आली अन् शिक्षकाचा विषयच The End
Crime News : पायलने आपण जमिनीच्या व्यवहारात सक्रिय असल्याचे सांगून शिक्षकाचा विश्वास संपादन केला आणि एक स्वस्त जमीन विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे आमिष दाखवले. जमीन पाहण्याच्या बहाण्याने शिक्षकाला राजकोटला बोलावून घेण्यात आले, जिथे एका हॉटेलमध्ये पूर्वनियोजित कटांतर्गत त्यांना 'हनीट्रॅप'मध्ये अडकवून बदनामीची भीती दाखवण्यात आली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तेजल, पायल अन् अंजली, निवृत्त शिक्षक हनीट्रॅपच्या जाळ्यात पुरता फसला
हॉटेलमध्ये विना कपड्यांची समोर आली ब्लॅकमेलर
Crime News: एका निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आणि त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून लाखो रुपये उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वारंवार होणाऱ्या पैशांच्या मागणीला कंटाळून अखेर पीडित शिक्षकाने हिंमत एकवटली आणि राजकोट क्राइम ब्रँचकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तांत्रिक तपास आणि गुप्तहेरांच्या माहितीच्या आधारे अवघ्या काही तासांत दोन महिलांसह तीन आरोपींना अटक केली.
अधिकची माहिती अशी की, 59 वर्षीय पीडित शिक्षक ऑक्टोबर 2025 मध्ये सेवानिवृत्त झाले होते. आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून आणि निवृत्तीनंतर मिळालेल्या रकमेतून त्यांना शेतीसाठी जमीन खरेदी करायची होती. याच इच्छेचा फायदा घेत पायल पटेल नावाच्या महिलेने त्यांना आपल्या जाळ्यात ओढले. पायलने आपण जमिनीच्या व्यवहारात सक्रिय असल्याचे सांगून शिक्षकाचा विश्वास संपादन केला आणि एक स्वस्त जमीन विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे आमिष दाखवले. जमीन पाहण्याच्या बहाण्याने शिक्षकाला राजकोटला बोलावून घेण्यात आले, जिथे एका हॉटेलमध्ये पूर्वनियोजित कटांतर्गत त्यांना 'हनीट्रॅप'मध्ये अडकवून बदनामीची भीती दाखवण्यात आली.
हॉटेलमधील तो बनाव आणि 40 लाखांची मागणी
जमीन पाहण्यासाठी शिक्षक राजकोटला पोहोचले असता, पायलने त्यांना एका हॉटेलमध्ये नेले. तिथे पोहोचल्यावर पायल फोन करण्याच्या बहाण्याने खोलीबाहेर गेली आणि त्याच वेळी तिच्या टोळीतील इतर महिलांनी खोलीत प्रवेश केला. त्या महिलांनी शिक्षकावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला आणि विरोध केला असता त्यांना पॉक्सो (POCSO) व बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. या टोळीने शिक्षकाचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केले. या व्हिडिओच्या आधारे त्यांच्याकडे सुरुवातीला 40 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. समाजात बदनामी होईल या धास्तीने आणि भीतीने ग्रासलेल्या शिक्षकाने अखेर 12 लाख रुपयांवर तडजोड केली. ही रक्कम त्यांनी आरटीजीएस (RTGS) माध्यमातून आरोपींच्या खात्यावर जमा केली, मात्र तरीही आरोपींचे समाधान झाले नाही आणि त्यांनी अधिक पैशांसाठी धमकावणे सुरूच ठेवले.
हेही वाचा : माता न तू, वैरिणी! आईने पाच महिन्यांच्या मुलाचं फरशीनं ठेचलं डोकं, किचमनध्ये लपवला मृतदेह; कारण वाचून बसेल धक्का
क्राइम ब्रँचची धडक कारवाई आणि आरोपींना अटक
अटकेत असलेल्यांमध्ये मुख्य सूत्रधार पायल पटेल, नीलेश झुंझा आणि तेजल टिंडानी यांचा समावेश आहे. तपासात असे समोर आले आहे की, पायल पटेल ही अट्टल गुन्हेगार असून तिला 2025 मध्ये अंकलेश्वर येथे अशाच एका हनीट्रॅप प्रकरणात अटक करण्यात आली होती. तसेच तेजल टिंडानी हिच्यावरही राजकोटमध्ये खंडणी आणि गुन्हेगारी कटाचे गुन्हे दाखल आहेत. या टोळीतील आणखी एक महिला आरोपी अंजली सोलंकी सध्या फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.









