माता न तू, वैरिणी! आईने पाच महिन्यांच्या मुलाचं फरशीनं ठेचलं डोकं, किचमनध्ये लपवला मृतदेह; कारण वाचून बसेल धक्का

मुंबई तक

Crime News : काळजाचा थरकाप उडवणारी एक बातमी समोर येत आहे. एका महिलेने आपल्या अवघ्या पाच महिन्यांच्या निष्पाप मुलाची निर्घृण हत्या केली. मनोरमा यादव असे या आरोपी महिलेचे नाव असून, तिने रागाच्या भरात टोकाचे पाऊल उचलत स्वतःच्याच पोटच्या गोळ्याचा जीव घेतला.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आईने पाच महिन्यांच्या मुलाचं फरशीनं ठेचलं डोकं

point

किचमनध्ये लपवला मृतदेह

point

कारण वाचून बसेल धक्का

Crime News : काळजाचा थरकाप उडवणारी एक बातमी समोर येत आहे. नवऱ्यासोबत वाद झाल्यानंतर एका महिलेने आपल्या अवघ्या पाच महिन्यांच्या निष्पाप मुलाची निर्घृण हत्या केली. मनोरमा यादव असे या आरोपी महिलेचे नाव असून, तिने रागाच्या भरात टोकाचे पाऊल उचलत स्वतःच्याच पोटच्या गोळ्याचा जीव घेतला. ईश्वर असं या लहानग्याचं नाव होतं. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज परिसरातील ही घटना आहे.

हे ही वाचा : 'नवरा माझ्यासमोरच सख्ख्या बहिणीसोबत संबंध ठेवतो, पोलिस कारवाईला घाबरतात..' बायकोची महिला आयोगाकडे तक्रार

नवऱ्यासोबत वाद अन् मुलाला संपवले

बुधवारी (11 मार्च) रात्री मनोरमा यादव आणि तिचा नवरा संतोष यादव यांच्यात किरकोळ कारणावरून जोरदार भांडण झाले. नवऱ्यासोबत झालेला हा वाद मनोरमाच्या इतका जिव्हारी लागला की, तिने त्याचा राग आपल्या पाच महिन्यांच्या चिमुरड्यावर काढला. तिने घरातील फरशीच्या तुकड्याने बाळाच्या डोक्यावर जोरदार वार करून त्याला जागीच ठार केले.

स्वयंपाकघरात लपवला मृतदेह

बाळाची हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मनोरमाने त्याचा मृतदेह स्वयंपाकघरात लपवून ठेवला होता. मात्र, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (12 मार्च) पोलिसांनी आरोपी मनोरमा यादवला अटक केली. पोलिसांनी घराची झडती घेतली असता स्वयंपाकघरात लपवलेला बाळाचा मृतदेह त्यांच्या हाती लागला.

हे वाचलं का?

    follow whatsapp