'नवरा माझ्यासमोरच सख्ख्या बहिणीसोबत संबंध ठेवतो, पोलिस कारवाईला घाबरतात..' बायकोची महिला आयोगाकडे तक्रार
Crime News : राष्ट्रीय महिला आयोगाच्या जनसुनावणीत एका महिलेने आपल्याच घरात सुरु असलेल्या भयानक प्रकाराचा खुलासा केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्यासमोर आलेल्या या तक्रारीने नात्यांवरच गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'नवरा माझ्यासमोरच सख्ख्या बहिणीसोबत संबंध ठेवतो, पोलिस कारवाईला घाबरतात'
बायकोची महिला आयोगाकडे तक्रार
Crime News : राष्ट्रीय महिला आयोगाच्या जनसुनावणीत एका महिलेने आपल्याच घरात सुरु असलेल्या भयानक प्रकाराचा खुलासा केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्यासमोर आलेल्या या तक्रारीने नात्यांवरच गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
हे ही वाचा : 'अहो, मला भजी खायची आहेत..', नवऱ्याला कॅन्टीनमध्ये पाठवलं, अन् नवविवाहिता इमरानसोबत पळून गेली!
जबरदस्तीने रुममध्ये बसवले जाते
एका पीडित महिलेने तिचा पती स्वतःच्या सख्ख्या बहिणीसोबत शारीरिक संबंध ठेवत असल्याचा गंभीर आरोप केला. इतकेच नव्हे तर, हे कृत्य सुरु असताना तिला जबरदस्तीने त्याच रुममध्ये थांबायला लावले जात असल्याचेही तिने नमूद केले. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये सुरु असलेल्या महिला आयोगाच्या जनसुनावणीदरम्यान हा प्रकार समोर आला.
पोलिस कारवाईला का घाबरतात?
पीडितेने प्रशासनावर ताशेरे ओढताना सांगितले की, तिने या प्रकरणाबाबत पोलीस आणि सासरच्या मंडळींकडे वारंवार मदतीची याचना केली, मात्र कोणीही तिला साथ दिली नाही. उलट पोलिसांनी तिची तक्रार नोंदवण्यासही नकार दिला. तक्रार नोंदवायला पोलिस का घाबरतात हे मला समजत नसल्याचंही पीडितेने सांगितले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.