'अहो, मला भजी खायची आहेत..', नवऱ्याला कॅन्टीनमध्ये पाठवलं, अन् नवविवाहिता इमरानसोबत पळून गेली!
Crime News : रिमझिम बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच पीतमची शुद्ध हरपली. त्याने परिसरात तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तिचा मोबाईल फोनही बंद येत होता. सुरुवातीला तिला काही धोका तर झाला नाही ना, या भीतीने तो व्याकुळ झाला होता. मात्र, बस स्थानकावरील प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ती फोनवर कोणाशी तरी बोलत खाली उतरली आणि लगबगीने निघून गेली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'अहो, मला भजी खायची आहेत..', नवऱ्याला कॅन्टीनमध्ये पाठवलं
अन् नवविवाहिता इमरानसोबत पळून गेली!
Crime News : एका नवविवाहितेने आपल्या पतीला अत्यंत चलाखीने चकवा देत भररस्त्यातून पलायन केले. ही घटना 9 मार्च 2026 रोजी दुपारी 2 च्या सुमारास बिलारी रोडवेज बस स्थानकावर घडली. पीतम सिंह हा आपली पत्नी रिमझिम हिला तिच्या माहेरून म्हणजेच रामपूरहून रिसिव्ह करून आपल्या घरी घेऊन जात होता. माहेरी सण साजरा केल्यानंतर रिमझिम पतीसोबत बसने प्रवास करत होती. मात्र, या आनंदाच्या प्रवासाचे रूपांतर काही वेळातच कायदेशीर गुंतागुंतीत होईल, याची पुसटशी कल्पनाही पीतमला नव्हती. प्रवासादरम्यान बस बिलारी स्थानकावर थांबली असता, रिमझिमने पतीकडे भजी खाण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याला कॅन्टीनमध्ये पाठवले. आपल्या पत्नीची हौस पुरवण्यासाठी पीतम आनंदाने खाली उतरला, पण जेव्हा तो हातात भजी घेऊन परतला, तेव्हा त्याची पत्नी जागेवर नव्हती. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातून ही घटना समोर आली आहे.
नियोजित कट आणि संशयाची सुई
रिमझिम बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच पीतमची शुद्ध हरपली. त्याने परिसरात तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तिचा मोबाईल फोनही बंद येत होता. सुरुवातीला तिला काही धोका तर झाला नाही ना, या भीतीने तो व्याकुळ झाला होता. मात्र, बस स्थानकावरील प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ती फोनवर कोणाशी तरी बोलत खाली उतरली आणि लगबगीने निघून गेली. पीतमने दिलेल्या तक्रारीनुसार, रिमझिमचे लग्न 1 डिसेंबर 2025 रोजी झाले होते, परंतु तिचे लग्नापूर्वीच इमरान नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. हा सर्व प्रकार केवळ पळून जाण्यासाठी रचलेला एक बनाव होता, असे आता स्पष्ट झाले आहे. पतीला भजी आणि पाणी आणण्याच्या बहाण्याने दूर पाठवणे, हा त्या कटाचाच एक भाग होता जेणेकरून गर्दीचा फायदा घेऊन ती आपल्या प्रियकरासोबत पसार होऊ शकेल. पीतमने याप्रकरणी ग्राम सागरपूर येथील इमरान या तरुणावर गंभीर आरोप करत पोलिसांत धाव घेतली आहे.
हेही वाचा : सासूने सुनेला रात्री 1 वाजता प्रियकरासोबत रेड हँड 'नको त्या' अवस्थेत पकडलं, अन् अर्धा तासात...










