नांदेड हादरले! शिक्षक अन् 2 मुलांच्या आत्महत्या प्रकरणात ट्वीस्ट, पोस्टमॉर्टेममधून धक्कादायक खुलासा

मुंबई तक

nanded crime news : नांदेडमधील शिक्षक आणि दोन मुलांच्या मृत्यू प्रकरणाला पोस्टमॉर्टेम अहवालानंतर धक्कादायक वळण मिळाले आहे. आत्महत्येपूर्वी शिक्षक पित्यानेच दोन्ही मुलांची हत्या केल्याचे तपासात समोर आले.

ADVERTISEMENT

nanded crime news
nanded crime news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

नांदेड हादरले! शिक्षक अन् 2 मुलांच्या आत्महत्या प्रकरणात ट्वीस्ट

point

पोस्टमॉर्टेममधून धक्कादायक खुलासा

nanded crime news : जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने आपल्या दोन मुलांसह कार गोदावरी नदीत टाकून आत्महत्या केल्याच्या नांदेडमधील घटनेने राज्यभरात खळबळ उडवली होती. मात्र या प्रकरणाला आता अत्यंत धक्कादायक वळण मिळाले आहे. शुक्रवारी सकाळी पुनेगाव येथील नदी पुलावर घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता पोस्टमॉर्टेम अहवालातून मन सुन्न करणारी माहिती समोर आली. आत्महत्या करण्यापूर्वी शिक्षक पित्यानेच आपल्या दोन्ही चिमुकल्या मुलांच्या छातीत आणि पोटात चाकूने वार करून त्यांचा खून केल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह कारमध्ये ठेवून स्वतः भरधाव वेगाने कार चालवत सुमारे 50 फूट खोल गोदावरी नदीत कार टाकून आत्महत्या केल्याचे तपासातून समोर आले. घटनेचा उलगडा झाल्यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्यात मयत शिक्षकाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या मारकुट्या नगरसेवकाचा जामीन रद्द, हायकोर्टाचा रमेश म्हात्रेंना दणका

सुरुवातीला आत्महत्येचा प्रकार असल्याचे मानले जात होते

सुनील मोरे आणि त्यांची पत्नी धम्मशिला मोरे हे दोघेही हिमायतनगर तालुक्यातील पोटा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांना सारा (वय 14) आणि सुमित (वय 10) अशी दोन मुले होती. गुरुवारी सायंकाळी सुनील मोरे हे दोन्ही मुलांना खासगी क्लासला सोडण्याच्या बहाण्याने कारमधून घराबाहेर पडले. मात्र त्यांनी मुलांना क्लासमध्ये न नेता अज्ञात ठिकाणी नेले. दरम्यान, मुले घरी परतली नसल्याने पत्नी धम्मशिला यांनी पतीला फोन करून विचारणा केली. त्यावेळी "माझ्यासोबत मुले नाहीत," असे सुनील मोरे यांनी सांगितल्याची माहिती समोर आली. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठच्या सुमारास ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुनेगाव पुलावरून कार थेट 50 फूट खोल गोदावरी नदीत कोसळल्याची घटना घडली. सुरुवातीला हा प्रकार आत्महत्येचा असल्याचे मानले जात होते.

हेही वाचा : सोनम वांगचुक अन् दिल्लीतील आंदोलनावर अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?

हे वाचलं का?