पोलिसांनी उपोषणस्थळावरुन ताब्यात घेतल्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली पोस्ट, पत्नीमार्फत दिला मेसेज
sonam wangchuk first message after police detention : उपोषणस्थळावरून पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सोनम वांगचुक यांनी पत्नी गीतांजली यांच्या माध्यमातून पहिला संदेश जारी केला. 20 जुलै रोजी संसद मार्च यशस्वी करण्याचे आवाहन करत त्यांनी 'अन्यायमुक्त आणि भयमुक्त भारत'ची हाक दिली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पोलिसांनी उपोषणस्थळावरुन ताब्यात घेतल्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली पोस्ट
पत्नीमार्फत दिला मेसेज
sonam wangchuk first message after police detention : दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या उपोषणस्थळावरून पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांचा पहिला संदेश समोर आला आहे. हा संदेश त्यांच्या पत्नी गीतांजली यांच्या माध्यमातून जारी करण्यात आला आहे. "20 जुलै... आजादी का दूसरा आन्दोलन, भयमुक्त भारत, अन्यायमुक्त भारत" असा संदेश त्यांनी दिला आहे. "पेपरफुटीसारख्या अन्यायातून मुक्ती आणि माझ्या बेकायदेशीर अटकेतून मुक्ती" अशी भूमिका मांडत त्यांनी भारताच्या "दुसऱ्या स्वातंत्र्य आंदोलनाचा" उल्लेख केला आहे. तसेच 20 जुलै रोजी संसदेकडे काढण्यात येणारा मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. संदेशाच्या शेवटी "माझ्या बेकायदेशीर अटकेतून, सफदरजंग येथून" असा उल्लेख करण्यात आला असून तो पत्नी गीतांजली यांच्या माध्यमातून पाठविण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा : सोनम वांगचुक अन् दिल्लीतील आंदोलनावर अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
सोनम वांगचुक यांच्यावर सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु
सोनम वांगचुक 28 जूनपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे बेमुदत उपोषण करत आहेत. उपोषणादरम्यान त्यांच्यामध्ये डिहायड्रेशनची लक्षणे दिसू लागल्यानंतर शनिवारी दिल्ली पोलिसांनी त्यांना तेथून हलवून सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांनी वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिल्याचे सांगण्यात आले आहे. सफदरजंग रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तातडीने वैद्यकीय हस्तक्षेप न झाल्यास त्यांची प्रकृती अधिक गंभीर होऊ शकते, असा इशारा दिला आहे. रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत जारी करण्यात आलेल्या मेडिकल रिपोर्टनुसार त्यांची प्रकृती स्थिर आहेत. मात्र, दीर्घकाळ सुरू असलेल्या उपोषणामुळे रक्तातील काही घटकांमध्ये बदल दिसून येत असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाच्या देखरेखीखाली त्यांच्यावर सातत्याने उपचारांची गरज असल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा : गावातील महिला शेतकऱ्यासोबत आक्षेपार्ह अवस्थेत, शेजाऱ्याने बघितलं अन् घात झाला










