पुणे: देहूगावात आयटी इंजीनियरने 3 महिन्यांच्या गर्भवती महिलेला संपवलं, स्वत:ने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी
Pune News : पुण्याच्या देहूगावातून मन सुन्न करून टाकणारी घटना घडली आहे. तीन महिने गर्भवती महिलेची तिच्याच पतीने निर्घृण हत्या केली. नंतर त्याने स्वत: जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्याने आपल्या स्वत:च्या अंगावर ब्लेडने वार केले आणि दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुण्याच्या देहूगावातून मन सुन्न करून टाकणारी घटना
नवऱ्याने तीन महिन्यांच्या गरोदर महिलेची केली हत्या
Pune News : कृष्णा पांचाळ - पुण्याच्या देहूगावातून मन सुन्न करून टाकणारी घटना घडली आहे. तीन महिने गर्भवती महिलेची तिच्याच पतीने निर्घृण हत्या केली. नंतर त्याने स्वत: जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्याने आपल्या स्वत:च्या अंगावर ब्लेडने वार केले आणि दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. यातच त्याचा पाय फ्रॅक्चर झाला होता. या त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणातील मृत महिलेची शुभांगी आकाश बारसकर (वय 28) अशी ओळख समोर आली. तर आरोपी नवऱ्याची ओळख आकाश रामदास बारसकर (वय 31) अशी ओळख समोर आली. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
हे ही वाचा : नागपूर: मुलगी ऑनलाईन गेमच्या जाळ्यात, उत्तर प्रदेशात नेऊन लैंगिक अत्याचार
आरोपी आकाश हा मूळचा अहिल्यानगरातील जामखेड तालुक्यातील वाघा गावातील आहे. आकाश हा आयटी इंजीनियर होता आणि पुण्याच्या हिंजवडी परिसरात एका मोठ्या कंपनीत सॉफ्टवेयर इंजीनियर म्हणून कार्यरत होता. तो आणि त्याचे कुटुंब देहूगाव परिसरात भाडेतत्त्वार फ्लॅट घेऊन राहत होता. ही घटना 20 सप्टेंबर रोजी सकाळी 4:30 ते 5:30 वाजण्याच्या दरम्यान घडली.
आयटी इंजीनियर नवऱ्याने तीन महिन्यांच्या गरोदर बायकोला संपवलं
गावात शेतीची जमीन घेण्यावरून पती-पत्नीत वाद सुरू होता. आकाशने गावात जमीन खरेदी केली होती. मात्र, पत्नीने जमीन खरेदी करण्यास विरोध केला होता, जमीन विकत घेण्यासाठी जो पैसा लागणार होता, त्यावरून दोघांमध्ये सातत्याने खटके उडत होते. कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार, याच मुद्द्यावरून पती-पत्नीत सातत्याने वाद झाले. शुभांगी ही तीन महिन्यांची गरोदर असूनही आकाश तिची काळजी घेत नव्हता, ज्यात त्यांच्यात नेहमी वाद उफळायचा.
स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न
या प्रकरणात नवऱ्याने गरोदर महिलेची हत्या करून स्वत:ला देखील संपवण्याचा प्रयत्न केला. या हत्येत नवऱ्याने धारदार शस्त्राने हल्ला करत महिलेची हत्या केली. मृत शुभांगीचे वडील सतीश मारुती काईत (वय 56) यांच्या तक्रारीवरून आकाश रामदास बारसकर विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 च्या 03(1) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
