लातूर: 18 वर्षीय तरुणांचा दुचाकीवरून अपघात, दोघांचा दुर्दैवी मृत्यू; घातपाताचा संशय

मुंबई तक

Latur news : लातूर येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दुचाकीवरून गावाला जाणाऱ्या 18 वर्षीय तरुणांचा अपघात झाला, या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.

ADVERTISEMENT

Latur news
Latur news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या तरुणांचा भीषण अपघात 

point

तरुणांचा दुर्दैवी अंत 

Latur News : अनिकेत जाधव - लातूर येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दुचाकीवरून गावाला जाणाऱ्या 18 वर्षीय तरुणांचा अपघात झाला. 18 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 3:30 ते रात्री 8 वाजण्याच्या सुमारास निलंगा तहसील येथील निटूर शिरूर महामार्गावर ही दुर्घटना घडल्याचे वृत्त आहे. शिरोळ वांजरवाडा गावात राहणारा बळिकाम कचरू धाडे (वय 18) हा त्याचा दुसरा मित्र वेदांत नागनाथ दिग्ने (वय 18) याच्यासोबत त्याचा धाकटा भाऊ कृष्णातला नितूर गावातून परत आणण्यासाठी गेला होता. 

हे ही वाचा : Astrology : बुध ग्रह चित्रा नक्षत्रात होणार गोचर, 'या' राशींना भरघोस फायदा

दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या तरुणांचा भीषण अपघात 

दोघेही मित्र MH 05 D V 7934 ही नंबरप्लेंट असलेल्या होंडा कंपनीच्या युनिकॉर्न बाईकवरून जात होते. या दरम्यान, भीषण अपघाताची घटना घडली. यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या घटनेबाबतची माहिती जाणून घेतली होती, नंतर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती. यानंतर घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले होते. हा अपघात झाला की अपघात घडवून आणला असा संशय व्यक्त केला जात आहे. 

तरुणांचा दुर्दैवी अंत 

निलंगा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जाधव आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी दाखल झाले, नंतर दोघांना ताब्यात घेत निलंगा शहरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले, जिथे डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. या अपघातानंतर दोन्ही तरुणांच्या कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे.

हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगर: 20 वर्षीय तरुणीला इमारतीच्या छतावर नेत केली जबरदस्ती

दरम्यान, या प्रकरणी मृत बळीरामचे वडील कचरू शिवाजी धडे (वय 45) यांनी नटूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर नटूर पोलिसांनी तक्रार दाखल केली आणि नागरिक सुरक्षा संहितेनुसार, घटनेची नोंद करून घेतली आहे. यादरम्यान अपघाताचे नेमके कारण समोर आले नसून याचा पोलीस पुढील तपास करत आहेत.