गावातील महिला शेतकऱ्यासोबत आक्षेपार्ह अवस्थेत, शेजाऱ्याने बघितलं अन् घात झाला

मुंबई तक

एका शेतकऱ्याला त्याच्या शेजाऱ्याने गावातील महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत बघितले होते. आपले गुपित उघड होऊ नये म्हणून शेतकऱ्याने त्याच्यावर चोरीचा आळ घेतला. मात्र यामुळे पुढं काय घडणार आहे, याची कल्पना त्या शेतकऱ्याला आली नाही. कानपूरमध्ये घडलेली ही घटना नेमकी काय आहे, जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

गावातील महिला शेतकऱ्यासोबत आक्षेपार्ह अवस्थेत

point

शेजाऱ्याने बघितलं अन् घात झाला

Crime News : उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका शेतकऱ्याच्या हत्येचा तपास करताना पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. येथील एका गावात ट्युबवेलवर दारू पार्टी झाल्यानंतर शेतकरी हरमोहन यादव यांची हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला या हत्याकांडात मृताच्या तीन मित्रांवर संशय व्यक्त करण्यात येत होता, मात्र पोलिसांनी सखोल तपास केला असता संपूर्ण कहाणीच बदलून गेली. या हत्येचे खरे कारण एका महिलेसोबतचे अनैतिक संबंध आणि 900 रुपये चोरीचा खोटा आरोप असल्याचे समोर आले असून, या रागातून शेजारी राहणाऱ्या शेतकऱ्यानेच ही हत्या केल्याचे समोर आले.

मित्रांसोबत पार्टी आणि मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, हरमोहन यादव यांनी बुधवारी (15 जुलै) रात्री आपल्या ट्युबवेलवर अर्जुन, मुलायम आणि श्याम या तीन मित्रांसोबत दारू पार्टी केली होती. यादरम्यान हरमोहन यांचे मुलायमसोबत कोणत्यातरी कारणावरून भांडण झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ट्युबवेलवर हरमोहन यांचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. कुटुंबाने तात्काळ त्या तीन मित्रांविरुद्ध हत्येची तक्रार दाखल केली, ज्यावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मात्र, मित्रांनी आपण निर्दोष असल्याचे सांगत नव्याने तपासाची मागणी केली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून एसीपी आशुतोष सिंह यांनी तपास चक्रे फिरवली. दरम्यान, गावातील एका तरुणाने पोलिसांना माहिती दिली की, घटनेच्या रात्री शेजारील शेताचा मालक धर्मेंद्र यादव गायब होता आणि सकाळी त्याच्या हातावर जखमेच्या खुणा होत्या.

हे ही वाचा : डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या मारकुट्या नगरसेवकाचा जामीन रद्द, हायकोर्टाचा रमेश म्हात्रेंना दणका

'असं' फिरलं प्रकरण

धक्कादायक बाब म्हणजे, कोणालाही संशय येऊ नये म्हणून धर्मेंद्र सकाळी हरमोहन यांच्या अंत्ययात्रेत आणि स्मशानभूमीतही सोबत गेला होता, पण दुसऱ्याच दिवशी तो कुटुंबासह सासरच्या घरी पळून गेला. पोलिसांनी या दिशेने तपास केला असता, काही दिवसांपूर्वी हरमोहन यांनी 900 रुपये चोरीचा आरोप करत त्याचे फावडे आणि कुदळ जप्त केल्याचे समोर आले. पोलिसांनी धर्मेंद्रला त्याच्या सासरच्या घरातून अटक करून पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्याने सांगितले की, महिन्याभरापूर्वी त्याने हरमोहनला गावातीलच एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. आपले गुपित उघड होईल या भीतीने हरमोहनने धर्मेंद्रवर चोरीचा खोटा आरोप करून गावात त्याची बदनामी सुरू केली होती. या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने हरमोहनचा काटा काढण्याचे ठरवले.

हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यातील वातावरण फिरलं, 'या' जिल्ह्यांत वरुणराजाचं रौद्ररूप

...आणि डाव साधला

बुधवारी रात्री जेव्हा हरमोहनचे त्याच्या मित्रांशी भांडण झाले, तेव्हा धर्मेंद्रला योग्य संधी मिळाली, कारण संशयाची सुई मित्रांवर जाणार होती. हरमोहन झोपल्यानंतर धर्मेंद्रने आधी काठीने त्याच्या डोक्यावर वार केला आणि नंतर फावड्याने गळा चिरून त्याची हत्या केली. या प्रकरणाचा खुलासा करताना पोलिसांनी सांगितले की, तांत्रिक आणि मॅन्युअल इंटेलिजन्सच्या आधारे मुख्य आरोपी धर्मेंद्र यादवला अटक करण्यात आली असून हत्येसाठी वापरलेले फावडेही जप्त करण्यात आले आहे. तसेच, पोलिसांनी आधी अटक केलेल्या तिन्ही मित्रांची या प्रकरणातून सन्मानपूर्वक मुक्तता केली आहे.

हे वाचलं का?