जळगाव: आदिवासी महिलेला गुंगीचं औषध दिलं, दोरीनं बांधून लैंगिक अत्याचार

मुंबई तक

Jalgaon crime : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील फत्तेपूर पोलीस ठाणे परिसरात एका आदिवासी महिलेवर लैंगिक अत्याचार केला. ही घटना गोदरी आण सुकानाईक तांडा या ठिकाणी घडल्याचे वृत्त आहे. आत्याचाराला बळी पडलेल्या महिलेचं वय वर्षे 30 आहे, या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.

ADVERTISEMENT

Jalgaon crime
Jalgaon crime
Google CTA

बातम्या हायलाइट

point

आरोपींनी पीडित महिलेच्या अन्नात गुंगीचं औषध मिसळलं 

point

पीडितेला दोरीने बांधून लैंगिक अत्याचार 

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील फत्तेपूर पोलीस ठाणे परिसरात एका आदिवासी महिलेवर लैंगिक अत्याचार केला. ही घटना गोदरी आण सुकानाईक तांडा या ठिकाणी घडल्याचे वृत्त आहे. आत्याचाराला बळी पडलेल्या महिलेचं वय वर्षे 30 आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. संबंधित प्रकरणात 7 ते 8 आरोपींविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 

हे ही वाचा : 'तो माझ्यासोबत नको तेच करायचा', सुनेनं सासऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेड मारलं

आरोपींनी पीडित महिलेच्या अन्नात गुंगीचं औषध मिसळलं 

पीडित महिला ही शेतमजूर असून संशयित आरोपींनी तिच्या अन्नात गुंगीचे औषध मिसळले. नंतर ती बेशुद्धवस्थेत पडली होती, नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. पीडितेला ब्लॅकमेलिंग करून पुन्हा अत्याचार करण्यात आला होता. नंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देखील दिली होती. आरोपींनी महिनाभरापूर्वी पीडितेला पुन्हा दुचाकीवरून पळवून नेले. 

पीडितेला दोरीने बांधून लैंगिक अत्याचार 

नंतर पीडितेला दोरीने बांधून आणि बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर पुन्हा अमानुषपणे अत्याचार करण्यात आला आणि त्याचे चित्रीकरण देखील करण्यात आले. अशातच पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींची नावे पोलिसांनी नोंदवलेल्या फिर्यादीनुसार, भारमल कृपाल साबळे (रा. गोदरी तांडा), रामेश्वर गणपत राठोड (रा. सुकानाईक तांडा),सुरज भिमसिंग राठोड (रा. सुकानाईक तांडा), पवन छगन राठोड (रा. सुकानाईक तांडा) या व्यतिरिक्त 3 ते 4 अज्ञात आरोपींचा देखील यात समावेश आहे.  

हे ही वाचा : लावण्याचा प्रपोजला नकार, चेतनने बसस्टँडवर चाकूने भोसकून संपवलं 

तपास यंत्रणांनी गांभीर्य लक्षात घेत उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणाचा एकूण तपास सुरू आहे. सध्या आरोपीचा शोध सुरू आहे. 

हे वाचलं का?