'आपले संबंध संपले आहेत..' विवाहित बॉयफ्रेंडला तरुणीने जिवंत जाळलं

मुंबई तक

एक तरुण आपल्या प्रेयसीला भेटायला गेला. मात्र त्याच्या प्रेयसीला हे संबंध संपवायचे होते. तिने त्याला खूप समजावलं, पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. याचा शेवट भयानक हत्येत झाला. अमृतसरमधील या घटनेत नेमकं काय घडलं, जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

आपले संबंध संपले आहेत..

point

विवाहित बॉयफ्रेंडला तरुणीने जिवंत जाळलं

Crime News : पंजाबच्या अमृतसरमधील एका विवाहित तरुणाच्या एकतर्फी प्रेमातून अत्यंत थरारक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. संदीप सिंग असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव असून, त्याचे आधीच लग्न झाले होते. मात्र, एका तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध जुळले होते. काही महिन्यांनंतर जेव्हा त्या तरुणीला संदीप विवाहित असल्याचे समजले, तेव्हा तिने त्याच्याशी बोलणे आणि भेटणे पूर्णपणे बंद केले. यामुळे निराश झालेल्या संदीपने वारंवार तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तरुणीने त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेर या वादावर पडदा टाकण्यासाठी संदीप तिला भेटायला ती राहत असलेल्या भागात पोहोचला.

'आपले संबंध संपले आहेत'

त्या दिवशी तरुणी आपल्या चुलत भावासोबत संदीपला भेटण्यासाठी आली. यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. तरुणीने संदीपला स्पष्ट शब्दांत समजावून सांगितले की, तो विवाहित असल्यामुळे ती आता त्याच्यासोबत कोणतेही नाते ठेवू शकत नाही आणि त्यांचे संबंध येथेच संपले आहेत. हे ऐकून संदीपचा राग अनावर झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रागाच्या भरात तरुणीला घाबरवण्यासाठी त्याने स्वतःच्या दुचाकीमधून पेट्रोल काढले आणि स्वतःच्या अंगावर ओतून घेतले. हा वाद सुरू असतानाच तिथे उपस्थित असलेल्या तरुणीने आणि तिच्या चुलत भावाने संतापून संदीपला पेटवून दिल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

हे ही वाचा : सोनम वांगचुक यांना पोलिसांनी उचललं, मला मारहाण झाली; दिपकेंचे आरोप अन् पोलिसांचं स्पष्टीकरण

तिघंही आगीच्या ज्वाळांत

संदीप पेटताच घटनास्थळी एकच आरडाओरडा झाला. स्वतः जळत असतानाच संदीपने रागाच्या भरात जवळच उभ्या असलेल्या आपल्या प्रेयसीला ओढून धरले. पेट्रोलमुळे संदीपच्या शरीरावरून आगीच्या तीव्र ज्वाळा निघत असल्याने त्याची प्रेयसीही या आगीत वाईट रीतीने होरपळू लागली. बहिणीला वाचवण्यासाठी तिचा चुलत भाऊ पुढे धावला आणि त्याने संदीपला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, परंतु या झटापटीत तो स्वतःही आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आणि गंभीर भाजला. स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत पाणी टाकून आग विझवण्याचा व तिघांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र आगीचा भडका एवढा मोठा होता की तरुणीला संदीपच्या विळख्यातून सोडवणे कोणालाही शक्य झाले नाही.

हे ही वाचा : मोठी बातमी : सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात नेलं, उपोषणामुळे प्रकृती खालावली

प्रियकराचा मृत्यू, प्रेयसीचं काय झालं?

या भीषण घटनेत संदीप सिंगचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याची प्रेयसी आणि तिचा चुलत भाऊ गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेतली. सध्या दोन्ही जखमींवर अमृतसरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात प्रेम, फसवणूक आणि त्यानंतर आलेला दुरावा कारणीभूत असल्याचे दिसत असले, तरी संदीपला नेमकी आग कोणी लावली—त्याने स्वतः की तरुणी आणि तिच्या भावाने—याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. याशिवाय संबंधित तरुणी संदीपला ब्लॅकमेल करत होती का, या बाजूनेही तपास सुरू असून, पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत व तरुणी शुद्धीवर आल्यानंतर तिच्या जबाबातून संपूर्ण सत्य समोर येईल.

हे वाचलं का?